Monday , 15 October 2018
Breaking News
Home » Breaking News » अंधुक प्रकाशामुळे कोलकाता कसोटी अनिर्णित

अंधुक प्रकाशामुळे कोलकाता कसोटी अनिर्णित

कोलकाता – अंधुक प्रकाशाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने कोलकाता कसोटीत आपला पराभव टाळला आहे. दुसऱ्या डावात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २३१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराट कोहलीच्या शतकाच्या आधारावर भारताने दुसऱ्या डावात ३५२ धावांवर आपला डोव घोषित केला. कोहलीने दुसऱ्या डावात १०४ धावांची शतकी खेळी केली. अखेरच्या दिवशी श्रीलंकेला उरलेली दोन सत्र फलंदाजी करणं भाग होतं. त्यामुळे कोलकाता कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली.
अपेक्षेप्रमाणे भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावात भेदक मारा करत श्रीलंकेच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला. एकामागोमाग एक फलंदाजांना माघारी धाडत भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला बॅकफूटलला ढकललं. दुसऱ्या डावात दिनेश चंडीमल आणि निरोशन डीकवेलाचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने भारतीय गोलंदाजीचा सामना केला नाही. ७ बळी माघारी गेल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने अंधुक प्रकाशाविषयी पंचाकडे तक्रार केली. याचसोबत ड्रेसिंग रुममधून पाणी पिण्याचा बहाणा करत सामन्यात वेळ घालवण्याचा प्रयत्नही केला. मात्र मैदानावरील प्रकाश कमी झाल्याच दिसताच पंचांनी दोनही कर्णधारांच्या सहमतीने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg