Breaking News
Home » बातम्या » आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार राजा ढाले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या दि 30 सप्टेंबर रोजी सत्कार*

आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार राजा ढाले यांचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या दि 30 सप्टेंबर रोजी सत्कार*

मुंबई  (हेमंत रणपिसे) दि.18 – आंबेडकरी चळवळीचे अग्रणी भाष्यकार तथा दलित पँथर चे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचा येत्या दि 30 सप्टेंबर रोजी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर येथे भव्य सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर ; मुंबई अध्याक्ष गौतम सोनवणे आणि राजा ढाले यांची सुकन्या गाथा ढाले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत दलित पँथर चे संस्थापक राजा ढाले यांचा येत्या दि 30 सप्टेंबर रोजी 78 वा वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधून राजा ढाले यांच्या कर्तृत्वाचा; नेतृत्वाचा; त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील योगदानाचा कृतज्ञ भावनेतून  गौरव करावा अशी संकल्पना पुढे आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी स्वतः पुढाकार घेऊन राजा ढाले यांचा सत्कार  सोहळा आयोजित केला आहे. येत्या दि 30 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 3 ते रात्री 10  वाजेपर्यंत  मुंबईत  प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे राजा ढाले यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास राजा ढाले उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी प्रा डॉ इंदिरा आठवले असणार आहेत.तसेच प्रमुख वक्ते म्हणून प्रचार्य बापूसाहेब माने ; प्रा आशालता कांबळे; सुधाकर गायकवाड हे उपस्थित राहणार असून या सत्कार सोहळ्याचे प्रमुख आयोजक रिपाइंचे राष्ट्रीय केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आहेत.या वेळी संगीत दिग्दर्शक प्रभाकर धाकडे यांचा तसेच लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर्स यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होईल.अशी माहिती रिपब्लिकन पक्षातर्फे आज पत्रकार पतिषदेत देण्यात आले.
ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक नेते राजा ढाले यांचा आणि केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा ऋणानुबंध खूप वर्षे जुना आहे.दलित पँथरच्या चळवळीत राजा ढाले आणि रामदास आठवले यांचे आपुलकीचे नाते महाराष्ट्राला माहीत आहे.  त्यांनंतरच्या काळात दोन्ही नेत्यांमध्ये अंतर वाढले हेही महाराष्ट्राने पाहिले आहे. दलित पँथर च्या विसर्जनानंतर प्रदीर्घ काळानंतर हे दोन नेते एका जाहीर कार्यक्रमात एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाची आंबेडकरी चळवळीत उत्कंठा लागली आहे. राजा ढाले यांच्या सत्कार सोहळ्याचे रामदास आठवले यांनी आयोजन  केले असल्याने या कार्यक्रमासाहेब अनेक अर्थाने आंबेडकरी जनतेतून स्वागत होईल असे सांगत या सोहळ्यास मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षातर्फे कारण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस रिपाइं चे ज्येष्ठ नेते उमाकांत रणधीर ; अमर कसबे ; रमेश गायकवाड; संदेश उमप; घनश्याम चिरणकर आदी अनेक  मान्यवर उपस्थित होते. 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »