Breaking News
Home » बातम्या » आंबेडकरी समाजाची ऐक्याची बैठक

आंबेडकरी समाजाची ऐक्याची बैठक

 

वर्तमान बी जे पी सरकार च्या काळात बहुजन समज्याची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे हे सामान्य माणसाला कळतच असेल. काही वर्षापूर्वी बी जे पी ही ठाण्या मध्ये अस्तित्वात नव्हती, पण बहुजन समाजातील काही स्वार्थी राजकारणी पैश्याच्या जोरावर जातीयवादी पक्ष्याचे चे साम्राज्य निर्माण केले व साकृतिक उत्सवाच्या नावाखाली जातीभेद निर्माण करून आपापसात मतभेद आणले. धर्माचे राजकारण करून महाराष्ट्रात अशांतता निर्माण केले. उदाहणादाखल भीमा कोरेगाव प्रकरण. म्हणून येणाऱ्या २०१९ मध्ये आपण सर्व मिळून मिसळून त्याचे पानिपत करायला हवे नाहीतर लाचारी व त्यांच्या दहशती खाली आपल्या येणाऱ्या पिढीतील तरुणांना राहावे लागेल यात तिळमात्र शंका नाही. म्हणून येणाऱ्या काळात समाज्याने राजकीय विचार करायला हवा. त्यासाठी आपले खासदार / आमदार आपण तयार केले पाहिजे निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. तन मन धनाने आपण आपली जबाबदारी पार पाडली गेली पाहिजे.
आज आपल्या समाजातील धनवान ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे पण त्यांनी जातीयवादी पक्ष्या पुढे लोटांगण घातले आहे. आज सकाळी दूरदर्शन वर बातमी पाहत असताना काँग्रेस सुद्धा हिंदुत्व स्वीकारून ह्याच मुद्द्यावर निवडणूक लडणार असे घोषित करण्यात येणार आहे. ह्या भारत भूमीला परत हिंदुराष्ट्र घोषित करून मनुवाद आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. संविधान विरोधी कायदा आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने चालणाऱ्या विचारवंतांना माओवादी / नक्षलवादी ठरविण्याचे काम हे सरकार करत आहे.. आपण लोकशाही मार्गाने वाटचाल करत असताना आपले विचार सुद्धा जाहीर करू शकत नाही. पुढील काळात आपण चार जन चोकात उभे राहून चर्चा सुद्धा करू शकणार नाही अशी परिस्थिती २०१९ नंतर येणार आहे.. म्हणून जातीयवादी पक्ष्याशी आपण एकटे लडू शकणार नाही .
सर्व मिळून आपले मत काय आहे ते जाणून घेण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा निवडणुकीत आपला एकमताचा उमेदवार तसेच कल्याण व डोंबिवलीत भागात विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करून आपली मते त्यांनाच देवून आपली एकि व ताकत ह्या जातीयवादी पक्ष्याला दाखविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच कल्याण शहरातून कमीत कमी दहा नगर सेवक निवडूण आणण्यासाठी प्रयत्न सुरू करणे गरजेचे आहे..
वार्ड बांधण्यासाठी व योग्य उमेदवार उभे करून आपली मते त्यांनाच देण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी दिनांक २२ तारखे ऐवजी 30 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी १०.०० ते २.०० या काळात धम्मदीप बुद्ध विहार, चिंचपाडा रोड कल्याण पूर्व येथे रिपब्लिकन फुले , शाहू, आंबेडकरी विचारांचे सर्वपक्षीय पदाधिकारी , कार्यकर्ते , इच्छुक उमेदवार यांनी येण्याचे आवाहन करीत आहोत. तुमचे विचार खूपच बहुमूल्य आहेत..

या कार्यक्रमासाठी आयु. श्यामदादा गायकवाड , आयु. सुरेश जी सावंत, आयु मनोजभाई संसारे, आयु सारंग थोरात , आयु दामोदर मोरे, आयु. विठ्ठल शिंदे, आयु संभाजी पवार, आयु. दादाभाऊ अभंग उपस्थित राहणार असून मौलाचे मार्गदर्शन मिळणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु विजय गायकवाड. ज्येष्ठ बौध्द धम्म प्रसारक व तालुका अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा भूषविणारे आहेत.
प्रमुख पाहुणे दलितमित्र अण्णासाहेब रोकडे, आयु देवचंद अंबादे,
प्रमुख उपस्थतीमध्ये : आयु शोभाताई केदारे , आयु ललिता आखाडे, आयु मायाताई कांबळे, आयु मीनाक्षी अहेर, आयु अपेक्षा दळवी, आयु अलका साळवे. आयु संजय बनसोडे,
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती चे आजी व माजी अध्यक्ष , सचिव , खजिनदार व सर्व पदाधिकारी , कल्याण मधील सर्व आंबेडकरी विचारांचे मंडळाचे अध्यक्ष, सचिव खजिनदार व पदाधिकारी .
महिला मंडळाचे अध्यक्ष सचिव खजिनदार इत्यादी.

कार्यक्रमाचे आयोजक आयु मिलिंद बेळमकर असून समाज्याच्या हितासाठी चार तास घालवू या. एक नवा इतिहास घडवू या.. असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमासाठी उपस्थिती हीच आपली एकीची वज्रमूठ.

आयोजन समिती स्थापन करण्यात येणार आहे. आयु राजेश भोसले , आयु महेंद्र भालेराव, आयु चंद्रकांत अव्हाडे, आयु म्हाछिन्द्र कांबळे, आयु सुनील शेंडे , आयु रुपेश हुंबरे, आयु विजय सुरडकर , आयु साहेबराव जमनिक ,

सूत्रसंचलन :चंद्रकांत सोनावणे
प्रचारप्रमुख : मिलिंद वानखेडे

कळावे आपला
आयोजक : मिलिंद बेळंमकर.

 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »