Breaking News
Home » Breaking News » खासदार महाडिक व आमदार पाटील यांची क्रीडा संघटनेतील पदे जाणार !

खासदार महाडिक व आमदार पाटील यांची क्रीडा संघटनेतील पदे जाणार !

केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीजिल्हा व राज्य क्रीडा संघटनांनी क्रीडा आचारसंहितेचे पालन करावे, असा आग्रह  धरल्याने जिल्ह्यातील क्रीडा संघटनातील पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. खासदार व आमदारांना क्रीडा संघटनातील पदे स्वीकारण्यास बंदी घातल्याने खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांच्यावर टांगती तलवार राहणार आहे.

जिल्हा व क्रीडा संघटनांनी आचारसंहितेचे पालन करावे असे पत्र राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार क्रिकेट नियामक मंडळामध्ये न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर क्रीडा आचारसंहिता तयार केली असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री राठोड यांनी पुढाकार घेतला आहे. राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सर्व क्रीडा संघटनांना विश्वासात घेऊन आचारसंहितेचे पालन केले जाईल असे स्पष्ट केले आहे. संघटनांनी सहकार्याची भूमिका न घेतल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

खासदार, आमदार तसेच सरकारी अधिकाऱ्यांना क्रीडा संघटनातील पदे स्वीकारण्यास बंदी घातली आहे. त्याचा फटका खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील यांना बसणार आहे. खासदार महाडिक हे जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर आमदार सतेज पाटील हे बॉक्सिंग, बास्केटबॉल आणि बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टांगती तलवार येणार आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »