Breaking News
Home » Breaking News » आयपीएल मध्ये सट्टा लावणाऱ्या अरबाज खानची कबुली.

आयपीएल मध्ये सट्टा लावणाऱ्या अरबाज खानची कबुली.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अभिनेता अरबाज खान याने सट्टा लावल्याची कबुली दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून कुख्यात सट्टेबाज सोनू जालान याच्या संपर्कात असल्याची कबुलीही त्याने दिली आहे. आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी ठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने ही कबुली दिली आहे. ठाणे पोलिसांनी शुक्रवारी अरबाजला सट्टेबाजीच्या संशयावरून समन्स धाडले होते. चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश या समन्समधून देण्यात आले होते.

सोनू जालान उर्फ सोनू मालद याच्याद्वारे मुंबईत सुरू असलेल्या सट्टेबाजीमध्ये अरबाज खानने सट्टा लावल्याचा पोलिसांना संशय  होता. तसंच अरबाजने यंदाच्या आयपीएलमध्ये २ कोटी ८० लाख तर, गेल्या वर्षी ४० लाखांचा सट्टा लावल्याचा संशय होता. १५ मे रोजी डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या सट्टेबाजीप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »