Breaking News
Home » News » आयपीएल मध्ये ‘कॉमेंट्री’ करायला येणार शास्त्री आणि द्रविड

आयपीएल मध्ये ‘कॉमेंट्री’ करायला येणार शास्त्री आणि द्रविड

भारताचे राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघ प्रशिक्षक राहुल द्रविड हे आयपीएलच्या पुढील हंगामामध्ये सामन्याचे समालोचन (कॉमेंट्री) करताना दिसण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली- भारताचे राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि १९ वर्षाखालील क्रिकेट संघ प्रशिक्षक राहुल द्रविड हे आयपीएलच्या पुढील हंगामामध्ये सामन्याचे समालोचन (कॉमेंट्री) करताना दिसण्याची शक्यता आहे. त्यांना आयपीएलचे दरवाजे खुले होण्यासाठी बीसीसीआय नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीमध्ये आहे.

शास्त्री आणि द्रविड हे भारताच्या संघांचे प्रशिक्षक आहेत. परस्पर हितसंबंधाच्या नियमामुळे दोघेही आयपीएलमध्ये प्रशिक्षण देऊ शकत नाही. पण, ते समालोचन मात्र करू शकतात, असे सर्वोच्च न्यायालय नियुक्त प्रशासकीय समितीला वाटत आहे.

बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले की, शास्त्री आणि द्रविड यांचे खेळाप्रति योगदान पाहता त्यांना किमान कॉमेंट्री करता यावी म्हणून बीसीसीआयची प्रशासकीय समिती आयपीएलच्या नियमांमध्ये काही बदल करण्याच्या तयारीत आहे. प्रशासकीय समितीने नियमांमध्ये बदल केले, तर शास्त्री आणि द्रविड यांना आयपीएलच्या पुढच्या मोसमात समालोचन करता येणार आहे.’’

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »