Breaking News
Home » Breaking News » आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचा हप्ता वाढणार

आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने कर्जाचा हप्ता वाढणार

रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण जाहीर केले असून वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने वाढ करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने बुधवारी पतधोरण जाहीर केले असून वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने वाढ करण्यात आली आहे.  रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने कर्जदारांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्ज महागण्याची शक्यता आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली. समितीचा व्याजदर बदलाबाबतचा निर्णय बुधवारी दुपारी जाहीर केला. २०१८-१९ मधील हे तिसरे द्विमासिक पतधोरण आहे. यापूर्वीच्या पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवित ६.२५ टक्के केला होता. मात्र, यंदा वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ केली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. बुधवारी अपेक्षेनुसार रिझर्व्ह बँकेने रेपोरेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली. या वाढीनंतर रेपो दर ६. ५० टक्के इतका झाला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »