Breaking News
Home » बातम्या » ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मागणीसाठी आठवले यांची शाह भेट

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मागणीसाठी आठवले यांची शाह भेट

मुंबई : हेमंत रणपिसे यांजकडून

*ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आरपीआयला सोडण्याच्या मागणीसाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट*

*ईशान्य मुंबई मतदारसंघ आरपीआय ला सोडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे अमित शाह यांनी दिले आठवलेंना आश्वासन*

मुंबई दि. 14 – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात यावा या मागणीसाठी आज आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची नविदिल्लीत भेट घेतली. रिपब्लिकन पक्षाचा एकही प्रतिनिधी लोकसभेत नसल्याने रामदास आठवले यांनी निवडून येऊन लोकसभेत रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करावे अशी देशभरातील आंबेडकरी जनतेची मागणी आहे. ईशान्य मुंबईतूनही जनतेची मागणी होत असल्याने हा मतदारसंघ आपल्याला सोडावी अशी आग्रही मागणी आठवलेंनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी झालेल्या चर्चेत केली. त्यावर उत्तर देताना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत बोलणार असल्याचे आश्वासन आपणास दिले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली आहे.

आज नविदिल्लीत रिपब्लिकन नेते रामदास आठवलेंनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. रिपब्लिकन पक्षाला ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सोडण्यात यावा अशी मागणी अमित शाह यांच्याकडे केली. त्यावर उत्तर देताना अमित शाह यांनी रामदास आठवलेंना आपण राज्यसभा सदस्य आहात तरी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ईशान्य मुंबई मतदारसंघ सोडण्याबाबतचा निर्णय घेऊ असे आश्वासन अमित शाह यांनी यावेळी दिले असल्याची माहिती ना रामदास आठवलेंनी दिली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व लोकसभेत असावे या साठी आपण लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार मागील वर्षभरापासून आपण दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात तयारी केली होती.मात्र शिवसेनेच्या कोट्यातील ती जागा देण्यास शिवसेनेचा विरोध झाल्याने भाजप ने त्यांच्या कोट्यातील ईशान्य मुंबई ही लोकसभेची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडावी अशी आग्रही मागणी ना रामदास आठवले यांनी आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेऊन केली.भाजप शिवसेना आरपीआय महायुती तर्फे निवडणूक लढविल्यास ईशान्य मुंबई ही जागा आपण जिंकू शकतो अशी चर्चा या भेटीत अमित शाह यांच्याशी झाली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ रिपब्लिकन पक्षाला सोडण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन अमित शाह यांनी आज रामदास आठवलेंना दिले आहे.भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची आज झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर रिपब्लिकन पक्षाचा दावा अधिक प्रबळ झाला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »