Breaking News
Home » बातम्या » एमपीएससीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती

एमपीएससीच्या प्रवेश प्रक्रियेला स्थगिती

मुंबई – मागास वर्गातील उमेदवारांना नियमबाह्य पद्धतीनं अपात्र ठरविण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारला फटकारत मुंबई उच्च न्यायालयानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेला अंतरिम स्थगिती दिली आहे.
आरक्षण प्रवर्गांतील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून अर्ज केल्यास अपात्र ठरवले जात असल्याचा आरोप करत अजय मुंडे यांनी जनहित याचिका केली आहे. त्यावरील प्राथमिक सुनावणीत न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. ‘गुणवत्तेच्या आधारावर एखादा इच्छुक उमेदवार खुल्या प्रवर्गातील जागेवर अर्ज करत असेल तर त्याला विरोध का? याविषयी पूर्वी उच्च न्यायालयानं काही निवाडेही दिलेले आहेत. तरीही असे होत असेल तर तो न्यायालयाच्या आदेशाचा अवमान आहे, अशा शब्दांत न्यायालयानं सरकारला खडसावत १ फेब्रुवारीपर्यंत सविस्तर उत्तर देण्याचे निर्देश दिले. तसंच, तोपर्यंत एमपीएससीच्या प्रवेश प्रक्रियेला अंतरिम स्थगिती दिली.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »