Breaking News
Home » Breaking News » एम .करुणानिधी : अपराजित नेता हरपला

एम .करुणानिधी : अपराजित नेता हरपला

 

चेन्नई : करुणानिधी यांनी प्रथम 1957 साली निवडणूक लढवली. ते कुलिदलाई येथून आमदार झाले. तर त्यांची शेवटची निवडणूक 2016 साली होती, जेव्हा ते थिरुवरूरमधून निवडून आले. अशाप्रकारे त्यांनी एकूण 13 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आणि एकदाही पराभूत झाले नाहीत.दक्षिण भारतातले प्रसिद्ध नेते, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास निधन झाले. मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या करुणानिधींना उपचारासाठी कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच हजारो समर्थकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. संपूर्ण तामिळनाडू शोकसागरात बुडाला आहे. दक्षिण भारतातल्या राजकारणाशिवाय साहित्य क्षेत्रातही करूणानिधी यांचे मोठे योगदान आहे

60 वर्षं लोकप्रतिनिधी राहिलेले एम. करुणानिधी यांचं 94 व्या वर्षी निधन झालं. ते वैयक्तिकरीत्या एकही निवडणूक हरले नाहीत. एवढंच नव्हे तर पाच वेळा मुख्यमंत्रिपद भूषवून तामिळनाडूला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्य बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

करुणानिधी यांचा जन्म 3 जून 1924ला तामिळनाडू राज्यातील नागापट्टनम जिल्ह्यात झाला. त्यांचा पूर्ण नाव मुथुवेल करुणानिधी. पण लोक त्यांना आदराने ‘कलैंग्यार’लहानपणापासून त्यांचा कल लिखाणाकडे होता. त्यावेळच्या जस्टिस पार्टीचे नेते अळगिरीसामी यांच्या भाषणांचा त्यांच्यावर इतका प्रभाव होता की त्यातून ते राजकारणाकडे ओढले गेले.

जस्टिस पार्टीचे नेते आणि मद्रास प्रांताचे माजी मुख्यमंत्री ‘पनगल किंग’ रामअय्यंगार यांच्यावरील एका 50 पानी पुस्तकानेही त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. आणि तरुण वयात ते राजकारणात आले.

वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी ‘तामिळ स्टुडंट्स फोरम’ची स्थापना केली आणि एक हस्तलिखित मासिकही सुरू केलं. याच दरम्यान 1940च्या दशकात त्यांची भेट सी. एन. अण्णादुराई यांच्याबरोबर झाली. अण्णादुराई हे त्यांचे राजकीय गुरू ठरले.अण्णा दुराई यांनी ‘पेरियार’ E. V. रामास्वामी यांच्या द्रविड कळघम (D.K.) या संघटनेतून बाहेर पडत द्रविड मु्न्नेत्र कळघम (DMK किंवा द्रमुक) या वेगळ्या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी 25 वर्षांचे करुणानिधी त्यांच्या अधिकच जवळचे झाले होते. म्हणून इतक्या कमी वयात करुणानिधी यांची निवड पक्षाच्या प्रसिद्धी आणि प्रचार समितीवर करण्यात आली.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »