Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » देश-विदेश » ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी भारताला धक्का, इटलीच्या कोर्टाकडून दोघे निर्दोष

ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी भारताला धक्का, इटलीच्या कोर्टाकडून दोघे निर्दोष

नवी दिल्ली – इटलीच्या एका न्यायालयाने बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड या व्हीव्हीआयपींसाठीच्या हेलिकॉप्टर खरेदीतील घोटाळ्याप्रकरणी सोमवारी दोघांना निर्दोष ठरवले. लिओनार्दोचे दोन माजी अधिकारी जुसपे ओरसी आणि ब्रूनो यांना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाच्या आदेशानुसार, सरकारी संरक्षण समूहाचे माजी प्रमुख आणि ऑगस्टा वेस्टलँडच्या हेलिकॉप्टर यूनिटचे प्रमुख राहिलेल्या ब्रूनो यांना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले. डिसेंबर २०१६ मध्ये इटलीच्या सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. इटली न्यायालयाचा हा निर्णय भारताला मोठा धक्का असल्याचे समजते. याप्रकरणी भारतातही खटला चालू आहे. दरम्यान, सीबीआयने या निकालाविरोधात इटलीच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करता येणार असल्याचे म्हटले आहे.

भारताला १२ व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी ४५० कोटी रूपयांची लाच दिल्याचे हे प्रकरण आहे. २०१६ मध्ये ओरसीला साडेचार तर ब्रूनोला ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
उल्लेखनीय म्हणजे, ऑगस्टप्रकरणी सीबीआयने वायूदलाचे माजी प्रमुख एस.पी.त्यागी सह ९ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. इटलीतील फिनमेकानिका ही ऑगस्टा वेस्टलँडची सहकंपनी आहे. या कंपनीने ३६०० कोटी रूपयांच्या १२ हेलिकॉप्टर पुरवण्याचे कंत्राट मिळवले होते. २०१० मध्ये झालेल्या या व्यवहारात इटलीच्या तपास यंत्रणेने लाचखेरीचा आरोप करत न्यायालयात खटला दाखल केला होता.
दरम्यान, सीबीआयने यावर प्रतिक्रिया देताना या निकालाचा भारतातील खटल्यावर काहीच परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. आमचा खटला मजबूत असून या दोघांविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचे सीबीआयने म्हटले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg