Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन !

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन !

वाशिम – विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सेवा देणाऱ्या कंत्राटी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले.

विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत सेवा देणाऱ्या कंत्राटी अधिकारी-कर्मचारी संघटनांनी ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील कर्मचारीही सहभागी झाले असून, यामुळे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे काम प्रभावित झाले.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शेकडो कर्मचारी सेवा देत आहेत. जवळपास १० ते १२ वर्षांपासून कामकाज करीत असल्यामुळे शासन निर्णयानुसार सदर काम हे नियमित कामकाज होत आहे. याच्या आधारे अभ्यास समितीचा नियमित शासन सेवेमध्ये समावेशनाबाबत सकारात्मक अहवाल शासनास पाठविण्यात यावा, सद्यस्थितीत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यां पैकी कोणालाही काढण्यात येऊ नये, त्यांच्या पुनर्नियुक्ती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल करू नये, ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स्’ रद्द करण्यात यावे, आशा कार्यकर्ती व आशा गटप्रवर्तक यांना शासनाच्या न्युनतम मानधन तत्वानुसार फिक्स मासिक वेतन देण्यात यावे, मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सध्या मिळत असलेल्या मानधनावर बिनशर्त १५ टक्के लॉयल्टी बोनस व ५ टक्के वार्षिक मानधन वाढ देण्यात यावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण सुरू करावे, नियमित कर्मचाºयांप्रमाणेच सर्व कंत्राटी कर्मचाºयांना वैद्यकीय प्रमाणके सुविधा सुरू करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांची जिल्हा अंतर्गत रिक्त जागांवर बदली, आंतरजिल्हा बदली सुरू करण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात यावे, १५ हजार रुपयाच्या वर मानधन असलेल्या नियमित महिला कर्मचाºयांप्रमाणे बाळंतपण रजा १८० दिवस व पुरूष कर्मचाºयास १५ दिवस सुरू करण्यात यावी, सतत तीन वर्षे एक्सलंट किंवा आऊटस्टँडिंग मुल्यांकन अहवाल असणाºया कंत्राटी कर्मचाºयांच्या पुनर्नियुक्ती प्रक्रियेमध्ये बदल करण्यात यावा, तालुका लेखा व्यवस्थापक यांचेवर प्राथमिक आरोग्य केंद्राचे पी.एफ.एम.एस. कामकाजाबाबत सक्ती करण्यात येऊ नये, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामकाजाच्या तासापेक्षा (आठ तास) जास्त वेळेसाठी कामावर थांबविण्यात आल्यास त्यांना जास्तीच्या कामासाठी नियमित वेतनापेक्षा दुप्पट दराने प्रत्येक तासासाठी अतिकालीन भत्ता देण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात यावी, कंत्राटी ए.एन.एम. यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लावण्यात येणाºया ड्यूट्या थांबविण्यात याव्यात, प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे समायोजनाच्या पत्रामध्ये बिंदुनामावलीची अट रद्द करावी तसेच एक वर्ष सेवेची अट रद्द करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ५०० रुपये मोबाईल भत्ता सुरू करण्यात यावा आदी मागण्या यावेळी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अधिकारी, कर्मचारी महासंघाने केल्या. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे कामकाज बुधवारी प्रभावित झाल्याचे दिसून येते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg