Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » बातम्या » खेळ » कर्णधारपद सोडलं त्याच दिवशी धोनी झाला कर्णधार

कर्णधारपद सोडलं त्याच दिवशी धोनी झाला कर्णधार

नवी दिल्ली – ‘कॅप्टन कूल’ असा नावलौकिक मिळवून महेंद्रसिंह धोनीनं ज्या दिवशी वनडे आणि टी-२०चं कर्णधारपद सोडलं होतं, योगायोगाने त्याच दिवशी त्याच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडलीय. दोन वर्षांनी आयपीएलच्या ‘रन’संग्रामात परतलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या कर्णधारपदाची धुरा धोनीकडे राहील, असं गुरुवारी जाहीर करण्यात आलं.
४ जानेवारी २०१७ रोजी महेंद्रसिंह धोनी वनडे आणि टी-२०च्या कर्णधारपदावरून स्वेच्छेने पायउतार झाला होता. कसोटी क्रिकेटला तर त्यानं आधीच अलविदा केला होता. त्याच्यानंतर टीम इंडियाचं नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं होतं. पण आता धोनीच्या चाहत्यांना ‘कॅप्टन कूल’ला पुन्हा कर्णधाराच्या रूपात पाहता येणार आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ही ‘शिक्षा’ पूर्ण झाल्यानं २०१८च्या आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ पुन्हा मैदानात उतरतोय. स्वाभाविकच, सीएसकेला दोन जेतेपदं मिळवून देणाऱ्या धोनीकडेच नेतृत्वाची धुरा सोपवण्याचा निर्णय संघमालकांनी घेतलाय. २०१७ च्या आयपीएल स्पर्धेत धोनी पुणे संघाकडून खेळला होता, पण कर्णधार नव्हता. त्यावरून बरीच टीकाही झाली होती, मात्र रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या मालकांनी आपला निर्णय बदलला नव्हता. धोनीनं शांतपणे हे पर्व खेळून काढलं होतं आणि आता तो कर्णधार म्हणूनच ‘घरवापसी’ करतोय. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने १४३ सामन्यांत सर्वाधिक ८३ विजय मिळवलेत.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg