Breaking News
Home » Breaking News » कर्नाटकात मतांच्या टक्केवारीत काँग्रेस पुढे, बसपालाही एक जागा

कर्नाटकात मतांच्या टक्केवारीत काँग्रेस पुढे, बसपालाही एक जागा

एरव्ही दुपारी साधारण दोन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होतील अशी अपेक्षा असतानाही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मात्र निकालांची परिस्थिती स्पष्ट नव्हती. यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेचे काही जण आश्चर्य व्यक्त करीत होते. पाच वाजता पक्षनिहाय बलाबल याप्रमाणे होते , बहुजन समाज पार्टी १, भारतीय जनता पार्टी ८३ विजयी तर २१ जागी आघाडीवर, काँग्रेस ५४ विजयी २४ आघाडीवर, जनता दल सेक्युलर २९ विजयी ८ आघाडीवर,प्रज्ञावंत जनता पार्टी १ विजयी तर १ जागा अपक्षला मिळाली.
या आकडेवारीनुसार काँग्रेस-जेडीएस आघाडीने वेगवान हालचाली सुरु केल्या असून कुमारस्वामी यांनी मणिपूर आणि गोवा च्या धर्तीवर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेस चे जेष्ठ नेते कर्नाटकात तळ ठोकून आहेत.

या निवडणुकीत काँग्रेसला एकूण मतदान १ कोटी ३५ लाख १६ हजार ६४६ एवढे झाले एकूण मतदानाच्या ३८ टक्के एवढे मतदान काँग्रेस पक्षाला झाले. तर भाजपाला एकूण ३६.२ टक्के मते पडली. त्यांना १ कोटी २९ लाख ३ हजार ३५८ मते पडली,जेडीएसला १८. ५ टक्के मते मिळाली त्यांना एकूण मतदान ६५ लाख ९० हजार ९६७ एवढे झाले. तर एक जागा मिळवणाऱ्या बसपा मतांच्या टक्केवारीत अपक्षांच्याही मागे आहे. अपक्षांनी ४ टक्के मते मिळवत एकूण मतांच्या टक्केवारीत चौथ्यास्थानी आहेत. तर बसपा ०. ३ टक्के मिळवत एकूण १ लाख ७ हजार ८७४ मते घेऊन एका जागेवर विजयी झाली. एआयएमईपी पक्षाला ९७ हजार २१२, तर बीपीजेपी पार्टीला ८० हजार ३२९ मते मिळाली. सीपीएम ८० हजार ३९१ मते मिळवत मतांच्या टक्केवारीत केवळ ०. २ टक्के मते मिळवू शकली.स्वराज आणि केपीजेपी पक्षांनाही तेवढेच मतदान मिळाले. मात्र या निवडणुकीत ०. ९ टक्के मतदान घेत नोटा म्हणजे नकार मतदानाने ३ लाख मते घेत आश्चर्य केले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »