Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार; पहिल्यांदाच दोन टप्प्यात अधिवेशन

केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार; पहिल्यांदाच दोन टप्प्यात अधिवेशन

नवी दिल्ली – नव्या वर्षातील (२०१८-१९) संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २९ जानेवारी ते ६ एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात होणार आहे. तर, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी ही माहिती दिली.

अनंतकुमार म्हणाले, यंदाचे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. तर दुसरा टप्पा ५ मार्च ते ६ एप्रिल या काळात होईल. दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.
आजवर अर्थसंकल्प सादर करण्याची तारिख २८ फेब्रुवारी असायची. त्यानंतर रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर केला जात असे. मात्र, सध्याच्या मोदी सरकारने २०१७ पासून ही अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढून १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्याचे निश्चित केले आहे. तसेच स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बंद करुन मुख्य अर्थसंकल्पातच तो समाविष्ट करण्यात आला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg