Breaking News
Home » Breaking News » केंद्र शासनाच्या स्वायत्त विज्ञान व तंत्रज्ञान संस्थांमध्ये एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाची पदे किती भरली याची केंद्र सरकारला माहीतीच नाही – माहीती अधिकारातून धक्कादायक बाब उघड

केंद्र शासनाच्या स्वायत्त विज्ञान व तंत्रज्ञान संस्थांमध्ये एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाची पदे किती भरली याची केंद्र सरकारला माहीतीच नाही – माहीती अधिकारातून धक्कादायक बाब उघड

        केंद शासनशासनाच्या  विज्ञान – तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देशातील विविध राज्यातील एकूण २६ स्वायत्त  विज्ञान व तंत्रज्ञान संस्थांमध्ये  एसी, एसटी  ओबीसी प्रवर्गाचा अनुशेष अंतर्गत  आरक्षित पदांवर किती  पदे भरली गेली याची माहीती केंद्र सरकारकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक  बाब माहितीच्या अधिकाराखाली उघड झाली आहे. 

     यासंदर्भात अधिक माहीती अशी की, केरळ मधील रेजी एपी यांनी केंद्रिय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाकडे सादर केलेल्या माहीती अर्जात ‘नोव्हेंबर २००८ ते ३१ मार्च २०१२ अखेर पावेतो केंद्रिय विज्ञान – तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली देशातील २६ स्वायत्त विज्ञान व तंत्रज्ञान संस्थांमधील एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातून अनुशेष असलेल्या रिक्त पदांवर किती पदे भरली गेली? असा प्रश्न विचारण्यात आला होता.  परंतु या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी केंद्रीय  मंत्रालयात कोणत्याही प्रकारची उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. याचा अर्थ आरक्षण अंतर्गत येणाऱ्या सामाजिक प्रवर्गाविषयी केंद्र सरकार बेजबाबदार आहे, हे स्पष्ट होते. 

    केंद्रीय  सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव पीएस कृष्णन यांनी यासंदर्भात माहीती देताना सांगितले की, एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाला प्रत्येक क्षेत्रात योग्य प्रतिनिधीत्व देऊन त्यांना सामाजिक न्याय देणे हे संविधानानुसार बंधनकारक आहे’.  केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व संस्थानी विविध विभागाची माहीती दिलीच पाहिजे, असेही त्यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »