Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » Breaking News » कोरेगाव भीमा-९ कोटी ४५ लाखांची नुकसान भरपाई राज्य सरकार देणार, गुन्हे मागे घेणार – मुख्यमंत्र्यांची माहिती

कोरेगाव भीमा-९ कोटी ४५ लाखांची नुकसान भरपाई राज्य सरकार देणार, गुन्हे मागे घेणार – मुख्यमंत्र्यांची माहिती

महाराष्ट्र  बंद प्रकरणातीलही गुन्हे मागे घेणार

31 तारखेला सायंकाळी सुरक्षा व्यवस्थेची रंगीत तालिमही घेण्यात आली नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ ते ११.३० ग्रामपंचायत भीमा कोरेगावने पोलिस स्टेशनमध्ये सुरक्षा व्यवस्थाच्या कारणाने बंदचे पत्र दिले. एक तारखेला सकाळी ११०० ते १२०० भगवे झेंडेधारी संभाजी महाराजांच्या समाधीवर मानवंदनेसाठी जमले. रोज साधारण शंभर दोनशेच लोक असतात. पोलिसांनी तात्काळ त्यांना रोखून मानवंदनेनंतर परत जायला सांगितले. त्यातले शंभर दोनशे मोटारबाईकवरचे लोक वळसा घालून रस्त्यावर रिंगण घालू लागले,  घोषणाबाजी दिली. त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना वेगळे केले. नंतर या टोळक्याने वाहतळांना लक्ष्य केले. तिथून पिटाळून लावल्यानंतर सणसवाडीत दगडफेकीच्या घटना घडल्या

पुणे – कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सरकार  9 कोटी 45 लाखांची नुकसान भरपाई दोणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेला उत्तर देताना दिली.  भीमा कोरेगाव घटनाप्रकरणी सरकार व्यक्ती, जाती,धर्म निरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई करत आहे.

या  प्रकरणात एकूण ५८ गुन्हे. १६२ अटकेत. जखमी पोलिस आधिकारी जखमी पोलिस . एक मृत्यूमुखी पडले. ९ कोटी ४५ लाखांची नुकसान झाली. त्याची भरपाई राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला. ३ तारखेच्या बंदमध्ये तीन कोटींचे नुकसान. १७ अॅट्रॉसीटीच्या ११९९ आरोपींना अटक. २०५४ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. फक्त २२ लोक आता अटकेत. बाकीच्यांची मुक्तता झाली आहे . ३०० ते ३५० लोकांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली. परंतु त्यांचीही बेल झाली. बंद प्रकरणातील गुन्हे मागे घेणार. गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त महासंचालकांची समिती नेमण्यात येईल. ही समिती तीन महिन्यात अहवाल देईल. पण, गुन्हेगारी पार्श्वभूमी वाल्या काही लोकांनी बहती गंगा मे हाथ धुवून लुटपाट केली. अशा लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.

महाराष्ट्र  बंद प्रकरणातील गुन्हे मागे घेणार. गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त महासंचालकांची समिती नेमण्यात येईल. ही समिती तीन महिन्यात अहवाल देईल. पण, गुन्हेगारी पार्श्वभूमी वाल्या काही लोकांनी बहती गंगा मे हाथ धुवून लुटपाट केली. अशा लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत असी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भीमा कोरेगावला मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदाचे २००वे वर्षे असल्याने मोठी गर्दी येणार हे ध्यानात घेत सरकारने पूर्वतयारी केली होती. आजूबाजूचे अतिक्रमण हटविले होते. १० एकर परिसराला अतिक्रमणमुक्त करून संरक्षक भिंत उभारण्याचे कामाला निधी उपलब्ध करून दिला. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी पालकमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आदल्या दिवशी भेटी दिल्या. तयारी केली. आढावा घेतला होता. येणाऱ्या गर्दीच्या सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. तीन चार महिन्यांपासूनच व्यवस्था सुरू केल्या होत्या.

विजयस्तंभावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक मिनिटही मानवंदना थांबली नाही. एक ते दोन तासात हा घटनाक्रम झाला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अफवांच पीक मोठ्या प्रमाणावर पिकलं होतं. पण, सुदैवाने मोठ्या बंदोबस्तामुळे मोठी दुर्घटना टाळली. एसटी व पीएमटी बसेची व्यवस्था करून भाविकांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी पोहचविले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg