Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » बातम्या » खडसेच खरे ‘स्वाभिमानी’; बाकीच्यांची परिस्थिती तुम्ही जाणता- अशोक चव्हाण

खडसेच खरे ‘स्वाभिमानी’; बाकीच्यांची परिस्थिती तुम्ही जाणता- अशोक चव्हाण

मुंबई – राज्य मंत्रिमंडळ आणि भाजपा पक्ष संघटनेतून बाजूला सारण्यात आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या दु:खावर गुरूवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी फुंकर घातली. ते रावेर येथे काँग्रेसचे स्थानिक नेते राजू रघुनाथ पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंच्या स्वाभिमानी स्वभावाची प्रशंसा करताना काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांना टोला लगावला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर एकनाथ खडसे हेच खरे स्वाभिमानी नेते आहेत, असे म्हणावे लागेल. बाकी स्वाभिमानी पक्ष काढणाऱ्यांचे काय झाले, हे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे, असे सांगत अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांना लक्ष्य केले.
नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडताना प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. गेल्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिलेल्या राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण भाजपकडून राणे यांची पदोपदी अडवणूक करण्यात आली आहे. माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, काहीही करा पण मला लवकर मंत्री करा, असे साकडेच मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुहूर्त लांबत चालल्याने हताश झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातले होते.
तर दुसरीकडे गैरव्यवहाराच्या प्रकरणात क्लीनचीट मिळूनही खडसे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात टाळाटाळ केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी रावेर येथील कार्यक्रमात मला पक्ष सोडायची इच्छा नाही. गेली ४० वर्षे मी भाजपसाठी काम करत आहे. पण जर पक्षानेच मला दूर केले, तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, राजकारणात काहीही शक्य असते, असे सूचक विधान केले. खडसेंनी व्यथा मांडल्यावर तिथे उपस्थित असलेले अशोक चव्हाणांनाही खडसेंना पक्षात येण्याची ऑफरच दिली. ‘नाथाभाऊ, तुमच्या मदतीसाठी आमची दारं सदैव उघडी असल्याचेही चव्हाणांनी सांगितले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg