Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » गुजरात: सहाव्यांदा भाजप सत्तेवर, रूपानींसमवेत २० मंत्र्यांनी घेतली शपथ

गुजरात: सहाव्यांदा भाजप सत्तेवर, रूपानींसमवेत २० मंत्र्यांनी घेतली शपथ

गांधीनगर – गुजरातच्या नवनिर्वाचित सरकारचे मुख्यमंत्री म्हणून विजय रूपाणी यांनी शपथ घेतली. गांधीनगर सचिवालयाच्या मैदानावर आयोजित या भव्य शपथग्रहण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री सहभागी झाले होते. भाजपने ६ पाटीदार, ६ ओबीसी, २ राजपूत, ३ आदिवासी, १ दलित आणि एका ब्राह्मण आमदाराचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे.

रूपाणी यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथग्रहण समारोहात सहभागी झालेल्या मोदींनी तत्पूर्वी अहमदाबादमध्ये रोड शोही केला. राज्यपाल ओ.पी. कोहली यांनी रूपाणी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्य मंत्रिमंडळातील १९ सदस्यांनीही शपथ घेतली.
यावेळी सौरभ पटेल, दिलीप ठाकोर, कौशिक पटेल, ईश्वर परमार, भुपेंद्र सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. कॅबिनेट मंत्र्यांशिवाय राज्यमंत्री म्हणून प्रदीप सिंह जडेजा, बच्चू भाई खाबड, परबत पटेल, पुरूषोत्तम सोलंकी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली.
या शपथग्रहण सोहळ्यास भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरूण जेटली, नितीन गडकरी, जे.पी.नड्डा, अनंत कुमार समवेत अनेक नेत्यांनी भाग घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, यूपीचे योगी आदित्यनाथ, छत्तीसगडचे रमन सिंह, राजस्थानच्या वसुंधरा राजे व भाजपशासित इतर राज्यातील मुख्यमंत्री सामील झाले होते. त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, आनंदीबेन पटेल आणि शंकरसिंह वाघेला हेही उपस्थित होते.

तत्पूर्वी, भाजपने १८२ पैकी ९९ जागांवर विजय मिळवून बहुमत मिळवले होते. निकालानंतर आमदारांच्या बैठकीत पुन्हा एकदा विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदी पसंती देण्यात आली. आजच्या सोहळ्यात सहा पाटीदार आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
विजय रुपाणींचे मंत्रिमंडळ
कॅबिनेट मंत्री: नितीन पटेल, आर सी फालदू, भूपेंद्र चुडासमा, कौशिक पटेल, सौरभ पटेल, गणपत वसावा, जयेश रादड़िया, दिलीप ठाकोर, ईश्वर परमार
राज्यमंत्री: प्रदीप सिंह जडेजा, परबत पटेल, पुरुषोत्तम सोलंकी, बचूभाई खाबड़, जयद्रथ परमार, ईश्वरसिंह पटेल, वासन अहिर, वैभवरी दवे, रमनलाल पाटकर, कुमार कनानी

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg