Breaking News
Home » Breaking News » गोवंडी, कुर्ला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्याना पिण्याचे पाण्याची सोय नाही

गोवंडी, कुर्ला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्याना पिण्याचे पाण्याची सोय नाही

मुंबई:

गोवंडी आणि कुर्ला येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विद्यार्थाना पिण्याच्या पाण्याची सोयच नसल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी अनेकवेळा तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे तर ,पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईसारख्या महानगरात अशाप्रकारे गैरसोय होत असेल तर उर्वरित भागात काय असेल असा सवालही यावेळी पालकांनी केला.  दि.९ ऑगस्ट रोजी विद्याविहार (प.) येथे शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला  मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणीचा पाढा  संविधान संवर्धन समीतीच्या कार्यकर्त्यांला बोलून दाखविला.  दोन्हीही ईमारतीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही.    जी सोय केलेली आहे ती रस्त्याच्या कडेला केली असुन ती जागा एवढी गलीच्छ आहे.तीथं कुणीही  पाणी पीत नाही.शिवाय मुलांनी सांगितले की, एक तर पाण्याची बॉटल आणतात.नाहीतर गेटवर असलेल्या कँन्टीनमध्ये जावुन पाणी प्यावे लागते.तेथील पाणी पिण्या योग्य नाही. तो प्रश्न आहे. मुलांनी सांगीतले की, संस्थाच्या आवारात असलेला  नळ्याचे पाणी तेलकट येत असल्याने  काही जण तोंड धुण्यासाठी ते पाणी वापरतात. येथील शौचालये घाणेरडी असतात.साफसफाई आठवड्यातून अथवा काही कार्यक्रमाच्या दिवशी होते.तेव्हा आम्ही  विद्याविहार स्टेशनच्या बाहेर असलेल्या शौचालयाचा,वापर करतोअसेही विद्यार्थ्यांनी सांगितले .

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »