Wednesday , 15 August 2018
Breaking News
Home » Breaking News » गोवंडी ‘च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही!

गोवंडी ‘च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही!

धुळे: मुंबई या महानगरात नागरिकांच्या जाणिवा अधिक प्रखर राहत असल्यामुळे येथील  नागरिक समस्या विरहित असतात असा सर्वसाधारण समज  आहे,  परंतु राष्ट्राची भावी पिढी असणारे विद्यार्थीही साधन-सोयींच्या विवंचनेत ग्रस्त असल्याचा किस्सा गोवंडी आणि कुर्ला मधून समोर आला आहे.  दि.९ आॕगस्ट रोजी विद्याविहार (प.) येथे शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोवंडी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणीचा पाढा संविधान संवर्धन समीतीच्या कार्यकर्त्यांला बोलून दाखविला. 1)संस्थेच्या  दोन्हीही ईमारतीत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. 2) जी सोय केलेली आहे ती रस्त्याच्या कडेला केली असुन ती जागा एवढी गलीच्छ आहे.तीथं कुणीही पाणी पीत नाही.शिवाय मुलांनी सांगितले की, एक तर पाण्याची बाॕटल आणतात.नाहीतर गेटवर असलेल्या कँन्टीनमध्ये जावुन पाणी प्यावे लागते.तेथील पाणी पिण्या योग्य आहे की नाही तो प्रश्न आहे. ३) मुलांनी सांगीतले की, संस्थाच्या आवारात असलेला नळाला  पाणी तेलकट येत असल्याने काही जण तोंड धुण्यासाठी ते पाणी वापरतात.४) येथील शौचालये घाणेरडी असतात.साफसफाई आठवड्यातून अथवा काही कार्यक्रमाच्या दिवशी होते.तेव्हा आम्ही विद्याविहार स्टेशनच्या बाहेर असलेल्या शौचालयाचा,वापर करतो.

About Admin