Breaking News
Home » Breaking News » छत्तीसगडमधील सरकारी शाळांना केंद्र सरकारने वाटलेल्या टॅबलेटमध्ये अश्लील फोटो प्रिलोडेड

छत्तीसगडमधील सरकारी शाळांना केंद्र सरकारने वाटलेल्या टॅबलेटमध्ये अश्लील फोटो प्रिलोडेड

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या वर्षाच्या सुरवातीला छत्तीसगडमधील सरकारी शाळांमध्ये या टॅबलेटचे वाटप केलेले. शाळांमधील हजेरीमध्ये होणारा गोंधळ टाळण्याच्या उद्देशाने या टॅबलेटचे वाटप करण्यात आलेले. दैनंदिन कामाचा लेखाजोखा एकाच सर्व्हरवर जमा करण्याचा हेतू या टॅबलेट वाटप योजनेमागे होते. जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये किंमत असणाऱ्या या टॅबलेटचे राज्यातील सर्वच सरकारी शाळांमध्ये वाटप करण्यात आले होते. छत्तीसगडमधील सरकारी शाळांना केंद्र सरकारने वाटलेल्या टॅबलेटमध्ये अश्लील फोटो प्रिलोडेड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य शहरांबरोबरच ग्रामीण भागातील अनेक सरकारी शाळांनी यासंदर्भातील तक्रार केली आहे. सर्वच सरकारी शाळांना वाटण्यात आलेले हे टॅबलेट सुरु करताच आधी अश्लील फोटो दिसत असल्याचे शाळांचे म्हणणे आहे.

या प्रकरणासंदर्भात छत्तीसगड क्षेत्राचे क्लस्टर रिसोर्स कॉर्डिनेटर असलेल्या गौरांग मिश्रा यांनी एनएनआय या वृत्तसंस्थेला या संबधित प्रकाराची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून माझ्याकडे अनेक शाळांनी या टॅबलेटबद्दल तक्रार केली आहे. प्रत्येक वेळेस हे टॅबलेट सुरु केल्यानंतर अश्लील फोटो दिसत असल्याच्या या तक्रारी असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. केवळ शहरातच नाही संपूर्ण राज्यभरातील शाळांनी या प्रकराच्या तक्रारी नोंदवल्याचे सांगतानाच याप्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. जोपर्यंत या समस्येवर योग्य उत्तर मिळत नाही तोपर्यंत शाळांना ऑफलाइन काम करण्याच्या सूचना करण्यात आल्याचेही मिश्रांनी सांगितले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »