Breaking News
Home » Breaking News » छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत दहा टक्के मागासांनाही लाभ!
छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत दहा टक्के मागासांनाही लाभ!

छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत दहा टक्के मागासांनाही लाभ!

>मुंबई – मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे.
शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने वाटेकरी आणल्याने मराठा समाजामधून तीव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले, की राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही केवळ मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले असताना मराठा विद्यार्थ्यांसाठी झगडून मिळवलेल्या शिक्षणाच्या सवलतीवरही अशा पद्धतीने घाला घालणे हा विश्‍वासघात आहे.

क्रांती मोर्चानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. मात्र आता खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागासांनाही ही योजना लागू होणार असल्याने या योजनेचे लाभार्थी वाढणार आहेत.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »