Breaking News
Home » लोक सहभाग » जाती आधारीत हत्यातील एका मुलीची यातना!

जाती आधारीत हत्यातील एका मुलीची यातना!

 

डँडी …
मी लहान असताना मला आवडलेली
प्रत्येक गोष्ट देण्याकडे तुमचा कल असायचा
मी आनंदी राहावी म्हणुण खुप काही करायचे तुम्ही
तुमच्या डोळ्यासमोरुन माझे बालपण निघुन गेले
तुमचे प्रेम तुमचा धाक
तुम्हाला वाटणारी काळजीही होतीच म्हणा!
बालपण गेले अन तरुणपण आले
माझ्या स्वप्नाना नवे कोंब फुटले
आता मला आयुष्यभरासाठी एक जोडीदार हवा होता
माझ्या सोबत हसणारा ..रडणारा
अन तो मला भेटला
अन पाहता क्षणी आवडला
भेटण बोलण होत राहील
मनाला पटल होत हाच तो योग्य वर आहे
ज्याच्याशी मी लग्न करावं
अन मी त्याच्याशी लग्न केल
अगदी तुमचा विरोध असताना सुध्दा
प्रेम विवाहच होता तो
आता प्रेम का कधी जात धर्म पाहुन होतं का?
पण ते तुम्हाला नव्हतं पटल
का तर तो आपल्या जातीचा नव्हता
डँडी ..
पण तो माणुस होता
आपल्याच सारखा
आज मला प्रश्न पडतोय
तुम्हाला माणुस म्हणावा का?
कारण तुम्ही माझ्या समक्ष त्याला निर्घुणपणे ठार मारलत
डँडी …
त्याचा दोष काय हे तरी सांगा?
त्याने तुमच्या मुलीवर जीवापाड प्रेम केल
हा दोष की
तो आपल्यापेक्षा वेगळ्या जातीत जन्माला आला
हा त्याचा दोष?
तसही ते त्याच्या हातात नव्हत ..
नाहीतर निदान तो ठरवून माझ्यासाठी तरी
आपल्याच जातीत जन्माला आला असता
पण डँडी …
तुम्ही त्याचा खुन केलात
कुणी दिला तुम्हाला हा अधिकार?
हां आता अधिकारच म्हणाल तर एक तुमच्या हाती होतं
आयुष्यभर निपुत्रिक राहायच!
म्हणजे माझा जन्म झाला नसता
अन मी दुस-या जातीच्या मुलाच्या प्रेमात पडले नसते
निदान त्याचा नाहक बळी तरी गेला नसता
पण ज्या गोष्टीचा अधिकारच नाही
तीच गोष्ट तुम्ही केलीत!
डँडी …कुठल्या जातीची घमेंड मिरवता तुम्ही
जात म्हणजे काय?ते तरी सांगा!
कुणी दिली ही जात
कस ठरवल ही जात श्रेष्ठ ही कनिष्ठ
सगळ्याच सारखच असत ना?
का विषिष्ट जातीत जन्माला आल्यास काही वेगळे शरीर अवयव मिळतात
का विशिष्ट जातीत जन्मल्यावर भुक लागत नाही
का विशिष्ट जातीत जन्मलेले आईच्या कुशीतुन न जन्मता आभाळातुन पडतात
काय आहे ही जात?
काय फायदे आहेत त्याचे
सांगा डँडी, मला ऐकायचेत!
काही नाही हो…..!
जन्म आणि मुत्यू सा-यांना सारखच
शेवटी तुमचही अस्तित्व क्षणभंगुरच
आता काय?
तुम्हाला आयुष्यभर तुरुंगात राहावे लागेल
तुम्ही भोगाल ते!
पण एक करा
आपल्या चुकीची जाणीव कधीच होऊ देऊ नका!
कारण जर ती जाणीव तुम्हाला जर झाली तर
तुम्हाला नीट जगु देणार नाही
अन माझं उध्वस्त आयुष्य तुमच्या डोळ्यासमोर राहीलच
ते तुम्हाला नीट झोप येवू देणार नाही!
डँडी ….
खुप भंयकर चुक केलीत तुम्ही
एकाच वेळी माझ अन तुमच अन त्याच ..सगळ्याचच
आयुष्य उध्वस्त केलत!
का केलत हे?
खुप भंयकर चुक केलीत तुम्ही!

@राजू रोटे

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »