Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » देश-विदेश » जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तुमच्याशी संवाद साधायला येतोय: केजरीवालांचे मराठीत ट्विट

जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तुमच्याशी संवाद साधायला येतोय: केजरीवालांचे मराठीत ट्विट

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे दि. १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ जयंती दिनी सिंदखेड राजा येथे येत आहेत. यावेळी ते सभा घेणार असल्याचेही समजते. या निमित्त त्यांनी आज (मंगळवार) मराठीतून ट्विट केले आहे. नमस्कार, राजमाता जिजाऊ जयंती दिनी १२ जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम जनतेशी संवाद साधायला सिंदखेड राजा येथे येत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

केजरीवाल हे येथे सभा घेणार आहेत. सुरूवातीला पोलिसांनी केजरीवाल यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. नंतर पोलिसांनी या सभेला परवानगी दिल्याचे समजते. त्यामुळेच केजरीवाल यांनी मराठीतून ट्विट करत महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, केजरीवाल यांच्या उपस्थितीत राज्यातील पर्यायी राजकारणाची घोषणा होणार आहे. भाजपा व काँग्रेस यांचे जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाच्या राजकारणाच्या धोरणामुळे देशात अराजकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली मॉडेल राजकारणाचा पर्याय निर्माण करण्यात येत आहे, असे शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. या पर्यायी राजकारणाच्या मुद्दय़ावर सिंधुदुर्गात स्वतंत्र पॅटर्न राबवून दहशतवाद, गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी समविचारी पक्षांशी समझोता करू असे त्यांनी सांगितले होते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg