Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » डॉक्टर उपलब्ध झाला नाही, गरोदर महिलेचा मृत्यू

डॉक्टर उपलब्ध झाला नाही, गरोदर महिलेचा मृत्यू

मुंबई : जे.जे. रुग्णालयातं डॉक्टरांची सुमारे तासभर वाट पाहूनही कोणी डॉक्टर उपलब्ध झाला नाही आणि एका गर्भवती महिलेला तिच्या पोटातल्या बाळासह मृत्यूने कवटाळले. जळगाववरून या महिलेला उपचारांसाठी जेजेत आणण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी ही घटना घडली.

रुग्णालयात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा होता आणि आयसीयुतले बेडही रिकामे नव्हते, अशी कारणं ड्युटीवर असणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहेत. वैशाली निकम असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे. विशेष म्हणजे आमदार एकनाथ खडसे यांनीही या महिलेला तातडीने उपचार मिळावेत म्हणून जेजेचे अधिष्ठाता एस. डी. नानडकर आणि आरोग्य अधीक्षउ डॉ. संजय सूरसे यांना फोन केले होते, पण दोघांचे फोन बंद होते. खडसे यांनी हा मुद्दा विधीमंडळातही उपस्थित केला आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने वैशाली निकम यांच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे. वैशाली यांना जेजे रुग्णालयाच्या बाहेर थांबवून ठेवण्यात आले होते, हेही संचालनालयाने मान्य केले आहे.

जळगाव येथे राहणाऱ्या वैशाली यांना बाळंतपणासाठी जळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी वैशाली यांना जेजेत दाखल करण्याचा सल्ला वैशालीचे पती समाधान यांना दिला. वैशाली यांना अॅम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आले. पहाटे ५.३० वाजता अॅम्ब्युलन्स जेजेला आली. वैशाली यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे आणि जेजेत ते उपलब्ध नाही, शिवाय आयसीयूत बेडही नाही असे समाधान यांना डॉक्टरांनी सांगितले. ‘मी डॉक्टरांना खूप विनवण्या केल्या. पण किमान एकदा अॅम्ब्युलन्सपर्यंत येऊन पत्नीला बघायलाही डॉक्टर तयार नव्हते.’ एका तासाच्या खटपटीनंतर नातेवाईकांनी वैशालीला जेजेत दाखल करून घेतले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg