Breaking News
Home » Breaking News » डॉ. मनिषा बांगर यांचे नितीन गडकरींना आव्हान! लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार
डॉ. मनिषा बांगर यांचे नितीन गडकरींना आव्हान!               लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार

डॉ. मनिषा बांगर यांचे नितीन गडकरींना आव्हान! लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार

नागपूर : भारताच्या प्रसिद्ध गॅस्ट्रो एन्ट्राॅलाजिस्ट तथा पिपल्स पार्टी आॅफ इंडिया च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. मनिषा बांगर या केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढविणार असल्याने भाजपसमोर जबरदस्त आव्हान निर्माण झाले आहे.

डॉ. मनिषा बांगर या उच्च विद्याविभूषित असून वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च पदवी त्यांनी मिळवली आहे. याबरोबरच त्या सामाजिक चळवळीत सक्रिय आहेत. बामसेफ च्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी आणि योगदान पाहता त्यांना पिपल्स पार्टी आॅफ इंडिया च्या थेट उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. प्रचंड जनसंपर्क आणि देशभरात कार्यक्रमानिमित्त सततचे दौरे त्याचबरोबर यातून त्या जनतेचे पाठबळ असणाऱ्या नेत्या बनल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वांची ही जमेची बाजू पाहून त्यांना थेट नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला.

डॉ. मनिषा बांगर या मुळच्या नागपूरच्या असून सध्या वैद्यकीय व्यवसायानिमित्त हैद्राबाद येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे नातेवाईक सर्व नागपुरात वास्तव्याला आहेत. त्याचप्रमाणे आंबेडकर चळवळीतील महिलांच्या पहिल्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या सुलोघनाताई डोंगरे त्यांच्या जवळच्या नात्यातल्या. गेल्या दोन वर्षांपासून नागपूर येथे अखिल भारतीय महिला सामाजिक परिषदेचे त्यांनी आयोजन केले. या वर्षीदेखील ९ आणि १० मार्च रोजी त्यांनी राष्ट्रीय महिला सामाजिक परिषदेचे आयोजन केले.

नागपुर शहरातील त्यांचा व्यापक गोतावळा आणि देशभर जनसंपर्क यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्या नितीन गडकरी यांच्याविरोधात कडवे आव्हान उभे करतील अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »