Breaking News
Home » बातम्या » आरोग्य / वैद्यकीय » डॉ. राहुल गजभिये यांची वर्ल्ड एंडोमेट्रिओसीस सोसायटीच्या राजदूतपदी निवड

डॉ. राहुल गजभिये यांची वर्ल्ड एंडोमेट्रिओसीस सोसायटीच्या राजदूतपदी निवड

मुंबई, गुरुवार (प्रतिनिधी) – प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान येथील वैद्यकीय शास्त्रज्ञ डॉ. राहुल गजभिये यांची नुकतीच वर्ल्ड एंडोमेट्रिओसीस सोसायटीचे भारतीय राजदूत म्हणून निवड झाली आहे.
व्यांकोअर कॅ नडा येथे स्थित वर्ल्ड एंडोमेट्रिओसीस सोसायटी स्त्रियांच्या गर्भाशय संबंधित विकारांवरील संशोधनासाठी जगातील एक अग्रगण्य संस्था मानली जाते. जगभरातील वैद्यकीय शास्त्रज्ञ या संस्थेशी संलग्न आहेत.

वैद्यकीय शिक्षणात एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय चिकित्सा संशोधनात संशोधन करित 
मुंबई विद्यापीठातून पीएचडी झाले.  डॉ. गजभिये यांनी महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण तसेच शहरी विभागातील स्त्रियांच्या विकारासंबंधित विविध उपायात्मक योजना आणि त्यासंबंधित संशोधन संस्था उभ्या करण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे. स्त्रीविषयक विकारांवर संशोधन करण्यासाठी वल्डर्र् हेल्थ ऑर्गनायझेशनकडून संशोधनासाठी फेलोशिप देखील त्यांना प्राप्त झाली आहे. मोलेक्युलर बायोसायन्स युनिव्हर्सिटी ऑफ क्विंसलँड ऑस्ट्रेलिया येथे व्याख्याता म्हणून देखील ते काही काळ कार्यरत होते. डॉ. राहुल गजभिये हे पहिले भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ आहेत ज्यांची भारतीय राजदूत म्हणून या प्रतिष्ठित पदावर नेमणूक झालेली आहे

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »