Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » ‘तुमचे इंटेलिजन्स काय काम करते, दंगल होतेच कशी?’अतिरिक्त पोलिस महासंचालक यांचा यांचा

‘तुमचे इंटेलिजन्स काय काम करते, दंगल होतेच कशी?’अतिरिक्त पोलिस महासंचालक यांचा यांचा

अाैरंगाबाद शहरात शुक्रवारी मध्यरात्री दंगल घडवून अाणणाऱ्यांचा शाेध घेऊन पाेलिसांनी धरपकड सुरू केली अाहे. यात सहभागी २५००हून अधिक अज्ञात लाेकांवर दंगल भडकावणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण व खुनाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.शुक्रवारी मध्यरात्री दंगल भडकली ती सकाळपर्यंत सुरू हाेती. ती वेळीच राेखणे शक्य हाेते. मात्र पाेलिस अपयशी ठरले, अशी कबुली राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपिन बिहारी यांनी रविवारी दिली. ‘तुमचे इंटेलिजन्स काय काम करते, दंगल होतेच कशी?’ असा संतप्त सवाल करत त्यांनी पाेलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

अाेळख पटलेल्या ४० जणांवर थेट दंगलीचे गुन्हे दाखल केले असून २५ जणांना रविवारी अटकही करण्यात अाली. काही अल्पवयीन संशयितांचाही दंगलीत सहभाग असल्याची माहिती असून त्यावरून त्यांचाही शाेध सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.

शुक्रवारी जुन्या अाैरंगाबादेतील माेतीकारंजा भागात झालेल्या किरकाेळ वादाने दंगल भडकली. अनेक दुकाने, कार्यालये, घरे व वाहनांची जाळपाेळ झाली. दोघांचा मृत्यू झाला तर २५० पेक्षा अधिक लाेक जखमी झाले हाेते. पाेलिसांनी शनिवारी दुपारपासूनच सीसीटीव्ही फुटेज, सूत्र व इतर माध्यमांकडून माहिती गाेळा करत दंगेखाेरांची अाेळख पटवण्याचे काम सुरू केले अाहे. यापैकी काही संशयित जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू अाहेत, दंगलग्रस्त शहागंज, मोतीकारंजा, राजाबाजार, चेलीपुरा, गांधीनगरमध्ये पाेलिसांनी पंचनामे करून नुकसानीची माहिती घेतली.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg