Breaking News
Home » Uncategorized » तुमच्या रक्षणासाठी पुढं यायचं नाही का? सलमान खुर्शीद यांचा सवाल

तुमच्या रक्षणासाठी पुढं यायचं नाही का? सलमान खुर्शीद यांचा सवाल

विद्यापीठातील एका विद्यार्थ्यांनं काँग्रेसच्या सत्ताकाळात मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसची सत्ता असतानाच सर्वप्रथम अलीगड विद्यापीठाच्या कायद्यात बदल करण्यात आला. हाशिमपुरा, मुझफ्फरनगरच्या दंगली झाल्या. बाबरी मशिदीचे दरवाजे उघडले गेले. तिथं मूर्त्या ठेवल्या गेल्या. हे सगळं काँग्रेसच्या काळात झालं. काँग्रेसच्या अंगावर हे जे मुस्लिमांच्या रक्ताचे डाग आहेत, ते कसे धुणार?, असा संताप या विद्यार्थ्यानं व्यक्त केला. त्यावर बोलताना खुर्शीद यांनी काँग्रेसच्या चुकांची कबुली दिली.

हा राजकीय प्रश्न आहे. आमच्या अंगावर रक्ताचे डाग आहेत. मी स्वत: काँग्रेसचा असल्यानं माझेही हात रक्तानं डागाळलेले आहेत. पण म्हणून आम्ही आता तुमच्या रक्षणासाठी पुढं यायचं नाही का?,’ असा सवाल खुर्शीद यांनी केला. ‘आमच्या हातावर लागलेले रक्ताचे डाग तुमच्या हाताला लागू नयेत असं आम्हाला वाटतं. म्हणूनच आम्ही चुकांची कबुली देतोय. आमचे डागाळलेले हात तुमच्यापुढं ठेवतोय. तुम्ही समोरच्यावर हल्ले चढवाल तर तुमचेही हात डागाळले जातील. मागील घटनांपासून, इतिहासातून धडा घ्यायला हवा. दहा वर्षांनंतर तुम्हाला प्रश्न विचारणाराही इथं कुणी नसेल, अशी वेळ येऊ देऊ नका,’ असं खुर्शीद यावेळी म्हणाले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »