Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » तुमच्या 16 मंत्र्यांसाठीही कोठडीत जागा तयार ठेवा- धनंजय मुंडें

तुमच्या 16 मंत्र्यांसाठीही कोठडीत जागा तयार ठेवा- धनंजय मुंडें

पंढरपूर-चंद्रकांतदादा, आता दोन जागा नाही तर तुमच्या 16 भ्रष्ट्राचारी मंत्र्यांसाठी कोठडीत जागा तयार ठेवा असे प्रत्त्युत्तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या महामेळाव्यात अजित पवार आणि सुनील तटकरे यांना उद्देशून, भुजबळ यांच्या शेजारी आणखी दोन कोठडीच्या जागा मोकळ्या आहेत असे वक्तव्य केले होते. त्याला मुंडे यांनी लागलीच उत्तर दिले आहे.

हल्लाबोल यात्रेच्या चौथ्या टप्प्यात धनंजय मुंडे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. पंढरपूर येथे त्यांनी श्री विठुरायाचे दर्शन घेतले. शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठीच्या या संघर्षात लढण्याचे बळ दे असे साकडे त्यांनी घातले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप सरकार व चंद्रकांत पाटील यांना फटकारले.

धनंजय मुंडे म्हणाले, भारतीय जनता पक्ष आम्हाला घाबरला आहे. त्यांची सत्ता जाणार आहे हे त्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर आम्ही जेव्हा जेव्हा सरकारले घेरले व हल्लाबोल आंदोलन केले तेव्हा तेव्हा फडणवीस सरकारने आम्हाला धमक्या देत घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही घाबरत नाही. गेली साडे तीन वर्षे त्यांचे सरकार आहे त्यात त्यांना काहीही सापडलेले नाही. तरीही केवळ जनतेत आम्हाला चुकीचे दाखविण्यासाठी भाजप नेते आमच्या नेत्यांवर आरोप करतात. आता तर यांचे सरकार जाणारच आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा, कोठडीच्या दोन जागा नव्हे तर तुमच्या 16 भ्रष्ट मंत्र्यांसाठी कोठडीची जागा तयार करा असे प्रत्त्युत्तर दिले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg