Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » Breaking News » त्रिपुरात विप्लबकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

त्रिपुरात विप्लबकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

आगरतळा : त्रिपुरामध्ये शुक्रवारपासून भाजपा पर्वाला सुरुवात झाली. विप्लबकुमार देव यांनी शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुरलीमनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.

त्रिपुरा हा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपाने डाव्या पक्षांचा पराभव केला. भाजपाच्या या विजयात विप्लबकुमार देव यांचे मोलाचे योगदान होते. भाजपाने त्रिपुऱ्यात मुख्यमंत्रीपदासाठी विप्लबकुमार देव यांची निवड केली. शुक्रवारी आगरतळा येथे विप्लबकुमार देव यांचा शपथविधी सोहळा पार पडला. विप्लबकुमार देव यांच्यासह जिश्नू देव बर्मन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर संतना चकमा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विप्लब या निवडणुकीत बनामालापूर मतदारसंघातून मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढविली होती.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg