Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » दलितांवर पोलिस अत्याचार वाढले-भाजपच्या दोन दलित खासदारांचे पात्र

दलितांवर पोलिस अत्याचार वाढले-भाजपच्या दोन दलित खासदारांचे पात्र

लखनऊ : रॉबर्ट्सगंज येथील खासदार छोटेलाल खरवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून म्हटले होते की गुन्हेगार अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवत आहेत. तरीही त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही. दलित खासदार छोटेलाल यांच्या पत्राला 24 तासही उलटत नाही तर, भाजपच्या आणखी दलित खासदाराचे पत्र समोर आले आहे. इटावाचे खासदार अशोक दोहरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. दलितांवर पोलिसांकडून होणाऱ्या अत्याचारावर त्यांनी आवाज उठवला आहे.

खासदार अशोक दोहरे यांनी मोदींना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या अत्याचाराचा उल्लेख केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने अॅट्रॉसिटी कायदा सौम्य केला गेल्याच्याविरोधात 2 एप्रिल रोजी ‘भारतबंद’ पुकारण्यात आला होता. यानंतर उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये दलितांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांना पोलिस त्रास देत असल्याचा आरोप अशोक दोहरे यांनी केला आहे.

पोलिस निर्दोष लोकांच्या घरात घुसून जातिवाचक शब्दांचा वापर करुन त्यांना घरातून ओढून काढत मारहाण करत आहेत. त्यांना अटक केली जात आहे. पंतप्रधानांनी याची लवकरात लवकर दखल घेऊन अधिकाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश देण्याची मागणी खासदार दोहरे यांनी केली आहे.

आपल्या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय आणि सुनील बन्सल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.
आपल्याच पक्षाकडून उपेक्षा होत असल्याची खंत छोटेलाल यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय यांना तीन वेळा भेटलो. सुनील बन्सल यांचीदेखील तीनदा भेट घेतली. मुख्यमंत्री आदित्यनाथांची दोन वेळा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी मला फटकारलेच. शिवाय कार्यालयातून जाण्यास सांगितले.
राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे आपण तक्रार केली. मात्र, तेथेही मला निराशाच पदरी पडली, असे छोटेलाल यांनी माध्यमांना सांगितले आहे. आपल्याच पक्षातील व्यक्तींकडून उपेक्षा सहन करावी लागत आहे.

 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg