Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » देश-विदेश » दिपिका पदुकोनचे कान आणि नाक कापणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस

दिपिका पदुकोनचे कान आणि नाक कापणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस

नवी दिल्ली – ‘पद्मावत’ चित्रपटावरुन निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. देशभरात करणी सेना आणि क्षत्रिय महासभेचे कार्यकर्ते चित्रपटाविरोधात हिंसक आंदोलने करीत आहेत. पद्मावतला विरोध करणारे लोक ठिकठिकाणी तोडफोड आणि आक्षेपार्ह वक्तव्ये करीत आहेत. या दरम्यान, कानपूर क्षत्रिय महासभेचा अध्यक्ष गजेंद्र सिंह याने अभिनेत्री दिपिका पदुकोनवर वादग्रस्त विधान केले आहे. पद्मावत चित्रपटात राणी पद्मावतीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या दिपिका पदुकोनचे नाक आणि कान कापून आणणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस देण्यात येईल असे सिंह याने म्हटले आहे.

दिपिकाचे कान आणि नाक कापून आणणाऱ्याचा योग्य सन्मान केला जाईल तसेच क्षत्रिय समाज त्याला १ कोटींचे बक्षीस प्रदान करेल असे सिंह याने म्हटले आहे. दिपिकाने महाराणी पद्मावतीची भूमिका साकरताना नाचणारी, गाणारी आणि अर्धनग्न कपडे घालणारी महाराणी साकारली आहे. याची तिला लाज वाटायला हवी, लक्ष्मणाने शूर्पणखेचे कान आणि नाक कापले होते. आता जो कोणी दिपिकाचे नाक आणि कान कापून आणेल त्याला आम्ही बक्षीस देऊ असे त्याने म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाकडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर आज पद्मावत चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला. मात्र, चित्रपटावरून ठिकठिकाणी करणी सेना आणि क्षत्रिय महासभेच्या सदस्यांकडून हिंसक विरोध होत आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg