Breaking News
Home » देश-विदेश » दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ABVP ला झटका; काँग्रेसच्या NSUI चा विजय

दिल्ली विद्यापीठ निवडणुकीत ABVP ला झटका; काँग्रेसच्या NSUI चा विजय

नवी दिल्ली – जेएनयू निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात उत्सुकतेच्या ठरलेल्या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेनं अनपेक्षित बाजी मारली आहे. भाजपप्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं (अभाविप) वर्चस्व मोडून काढत एनएसयुआयनं अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर नाव कोरलं आहे. अभाविपला सचिव आणि सहसचिव पदावर समाधान मानावं लागलं आहे.
दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (ABVP) ‘जोर का झटका’ देत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (NSUI) दणदणीत विजय मिळवला आहे. ‘एबीव्हीपी’चे वर्चस्व संपुष्टात आणत ‘एनएसयूआय’ने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदावर कब्जा केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एनएसयूआयच्या रॉकी तुसीद याने एबीव्हीपीच्या रजत चौधरी याचा पराभव केला. तर उपाध्यक्षपदावरही एनएसयूआयच्या उमेदवाराने विजय मिळवला. एबीव्हीपीला सचिव आणि सहसचिवपदावर समाधान मानावे लागले. एनएसयूआयने चार वर्षांनी वर्चस्व मिळवले असून, या निवडणुकीत मिळवलेला विजय सर्वात मोठा असल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
कडक बंदोबस्तात बुधवारी दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. एनएसयूआयच्या रॉकी तुशीदने अध्यक्षपदी विजय मिळवून एबीव्हीपीचे चार वर्षांपासूनचे वर्चस्व संपुष्टात आणले. एबीव्हीपीचे रजत चौधरी, तुशीद, एआयएसएची पारल चौहान आणि अपक्ष उमेदवार राजा चौधरी हे अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ४३ टक्के मतदान झाले. गेल्या वर्षी एबीव्हीपीने तीन पदांवर विजय मिळवला होता. त्यावेळी एनएसयूआयने सहसचिवपदावर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत एकूण ४३ टक्के म्हणजेच, सुमारे एक लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी मतदान केले होते. एकूण ४० महाविद्यालयांमध्ये इव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले होते. विद्यापीठांमधील वैचारिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत मोठी चुरस होती. त्यात एनएसयुआयची सरशी झाली. मागील वर्षी अभाविपनं तीन जागा मिळवत वर्चस्व राखले होते. तर, एनएसयुआयला सहसचिव पदावर विजय मिळाला होता.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »