Breaking News
Home » Breaking News » ‘देना बँक’, ‘विजया बँक’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ चे विलिनीकरणाची घोषणा

‘देना बँक’, ‘विजया बँक’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ चे विलिनीकरणाची घोषणा

देशातल्या तीन मोठ्या बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटलींनी केलीय. ‘देना बँक’, ‘विजया बँक’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ या तिन्ही बँकांच्या विलिनीकरणानंतर जन्माला येणारी बँक ही देशातली तिसरी मोठी बँक असेल असंही जेटलींनी जाहीर केलय.

ल्या अर्थसंकल्पात सरकारनं सार्वजनिक बँकांचं विलीनीकरण करण्याचं धोरण जाहीर केलं होतं. सरकारी बँकांची वाढती थकित कर्जे, देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सेवा पोचवण्यासाठी असलेला आग्रह या पार्श्वभूमीवर हे विलीनीकरण करण्यात आल्याचं समजतंय.

यापूर्वी देशातील सहा सहकारी आणि एका महिला बँका एसबीआयमध्ये विलिनी करण करण्यात आल्या. या मोठ्या बदलानंतर भारतीय स्टेट बँकनं दशकभरातील जवळपास १३०० शाखांचे नाव आणि आयएफएससी कोड बदललेत. तशी स्टेट बँक ऑफ इंडियानं शाखांचे बदललेले नावं आणि आयएफएससी कोडची यादी जाहीर केली होती.’देना बँक’, ‘विजया बँक’ आणि ‘बँक ऑफ बडोदा’ या देशातल्या तीन मोठ्या बँकांच्या विलिनीकरणानंतर त्या बँकांमधील कोणत्याच कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नसल्याचं जेटलींनी स्पष्ट केलंय. तर विलिनीकरणाच्या प्रक्रियेनंतर जन्माला येणाऱ्या नव्या बँकेचं आणि त्या बँकेच्या देशभरातील इतर शाखांचं नाव आणि आयएफएससी कोडही बदलतील अशी माहिती आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »