Sunday , 16 December 2018
Breaking News
Home » Breaking News » दोन मुलं जन्माला घालण्याचे धोरण सक्तीचे करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…

दोन मुलं जन्माला घालण्याचे धोरण सक्तीचे करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…

नवी दिल्ली : दोन मुलं जन्माला घालण्याचे धोरण सक्तीचे करण्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दोन मुलं जन्माला घालणं सक्तीचं करावं अशी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, पण आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आहे. 

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, केवळ दोन अपत्य असलेल्यांनाच सरकारी सुविधांचा लाभ घेता येईल असं या याचिकेत म्हटलं होतं. मात्र, हे धोरणाशी संबंधीत प्रकरण आहे, न्यायालय याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही, असं म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळली. 
वाढत्या लोकसंख्येला आळा बसावा यासाठी वकील प्रिया शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. 

 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg