Tuesday , 25 September 2018
Breaking News
Home » Breaking News » धुळे मारहाण प्रकरणी : २३ जणांना अटक, बहुतांश आरोपी विशीतले

धुळे मारहाण प्रकरणी : २३ जणांना अटक, बहुतांश आरोपी विशीतले

आरोपींवर हत्या (कलम ३०२)चा गुन्हा

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे बेदम मारहाणीत झालेल्या पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी काही आरोपी राईनपाडा गावचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतांश आरोपी २० ते ३० वयोगटातील आहेत. याप्रकरणी आणखीही काही लोकांचा पोलीस शोध घेत आहेत. या लोकांना शोधण्यासाठी पोलिसांची ५ पथके तयार करण्यात आली आहेत. मुळे पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून रविवारी ही घटना घडली होती. सोशल मीडियातून व्हायरल होत असलेल्या अफवेमुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी राईनपाडा येथे आठवडी बाजार भरला होता. या बाजाराच्या परिसरातच ही घटना घडली असून मृत लोक बाजाराच्या ठिकाणी एसटीतून उतरले होते. दरम्यान, त्यातील एक जण एका लहान मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. यामुळे गावातल्या काही लोकांचा ते लहान मुले पळवणारे असल्याचा समज झाला. त्यानंतर ही अफवा बाजारपरिसरात पसरल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर जमाव गोळा झाला. यांपैकी सुमारे ३५ जणांनी या पाच जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामधील १२ जण राईनपाडा गावाचे रहिवाशी होते. यामध्ये काही किशोरवयीन मुलांचाही समावेश होता, अशी माहिती धुळ्याचे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी दिली.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg