Breaking News
Home » Breaking News » नाशिक-नंदुरबार एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात, सहा ठार,पंधरा जखमी

नाशिक-नंदुरबार एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात, सहा ठार,पंधरा जखमी

नाशिक- देवळा तालुक्यातील भावडबारी घाटाच्या पायथ्याशी नाशिक-नंदुरबार एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात होऊन सहा प्रवाशी जागेवर ठार झाले आहेत. अपघातात बस पूर्णत: चिरडली गेली आहे. या अपघातात 15 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. त्यात चालक वाहकाचा समावेश आहे. जखमींना तात्काळ चांदवड-देवळा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

मिळालेली माहिती अशी की, नाशिक- नंदुरबार मार्गावरील भावडे फाट्याजवळ मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. नंदुरबारहून नाशिककडे येणारी बस भावडे फाट्‍याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरुन येणार्‍या ट्रकला धडकली. अपघात एवढा भीषण आहे की, बसची पूर्णपणे चिरडली गेली आहे. तसेच ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.

देवळा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »