Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत » निर्णय मात्र कोणीच …..?

निर्णय मात्र कोणीच …..?

घोषणांच्या साखळदंडात तुला
बंदिस्त करून .
तुझ्या विच्यारांचा मुडदा पाडला
जातोय .
जयंतीच्या माध्यमातून .
कोण म्हणत भिंम डोक्यात घ्या .
कोण म्हणत भिंम डोक्यावर घ्या
कोण म्हणत कृतीत घ्या.
कोण म्हणत पुस्तकात घ्या .
कोण म्हणत पुतळ्यात घ्या .
तर कोण म्हणत कृतीत घ्या .
मी म्हणतो भिंमांने काय काय,
केलं यावर नस्त तोंडसुरव घ्या .
शिका सघंटित व्हा संर्धष करा
याचा अर्थ जगण्यांसाठी घेतला.
कुणी पोटासाठी कुणी नोटासाठी
कुणी घोटासाठी भिंमविकतोय .
१२७वीस जयंत्या केल्या पण,
भिम विच्यांराचा एक तरी माणुस
दिसतोय.?
प्रत्येक जण व्यस्त आहे स्वताच्या
मैहफिलीत .
जे शिकले ते परदेशात .
जे संघटित झाले ते राजकारणात
जे संर्धष करतात ते जगण्यात .
पण वेळच मिळणे कुणाला भिम
विच्यार मनां मनांत रुजवण्यास .
म्हणुन गांधी पुन्हा हसतोय,
नोटावर चरखाफिरवत .
भिंमसैनिक नुस्ता बसलाय
त्याच्या कार्याचा गौरव मिरवत .
प्रत्येक जण हिते नुस्ते डोसं
देतोय स्वताच्या बढायीचे …?
पण निर्णय मात्र कोणीचं
घेईना लढाईचे …?
( सुधाकर कांबळे )

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg