Breaking News
Home » Breaking News » निवडणूक आचारसंहितेच्या काळात अवेळी संदेश पाठवला होऊ शकते कारवाई

निवडणूक आचारसंहितेच्या काळात अवेळी संदेश पाठवला होऊ शकते कारवाई

निवडणूक आचारसंहितेच्या काळात रात्री 10 ते सकाळी 7 या वेळी मतांसाठी विनंती करणारा संदेश पाठवला तर त्यावर आता कारवाई होऊ शकते, निवडणूक आयोगाने यासाठी ‘सी व्हिजिल’ हे अॅप लाँच केलंय. तसंच एखाद्या पक्षाने किंवा उमेदवाराने असा संदेश पाठवला तर त्याविरोधात तक्रारही दाखल होणार आहे.

निवडणुकीची आचारसंहिता अमलात आल्यानंतर रोजचा उघड प्रचार रात्री 10 वाजल्यानंतर थांबत असला तरी त्यानंतरही उमेदवारांचे ‘प्रचार कार्य’ फोन, एसएमएस, व्हॉट्सअॅपद्वारे अव्याहतपणे सुरूच राहायचे. मतदारांचे खासगी जीवन विस्कळीत करणारा हा त्रास थांबविण्यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना रात्री प्रचारासाठी फोन, एसएमएस, व्हॉट्सअॅपचा वापर करण्यास आता बंदी घातली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी ‘सी.व्हिजिल’ हे अॅप सुरू केलंय. एखाद्या पक्षाने किंवा त्यांच्या उमेदवाराने या काळात मॅसेज पाठवला तर त्याची तक्रार करण्यासाठी  सी, व्हिजिल अॅपमध्ये व्यवस्था मतदारांना करून देण्यात आली आहे. पाच राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने हे अॅप महत्वाचं आहे.आचारसंहितेच्या काळात रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत मतांसाठी विनंती करणारा संदेश एखाद्या पक्षाने वा उमेदवाराने पाठवला तर त्याची तक्रार करण्यासाठी ‘सी-व्हिजिल अॅप’ची व्यवस्था मतदारांना करून देण्यात आली आहे. पाच राज्यांत लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे नवे अॅप सुरू केले आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »