Breaking News
Home » Breaking News » न्यायमूर्ती बी.जी. कोळसेपाटील यांची बदनामी करणाऱ्यानी माफीनामा द्यावा

न्यायमूर्ती बी.जी. कोळसेपाटील यांची बदनामी करणाऱ्यानी माफीनामा द्यावा

तमाम माझ्या सर्व जातीधर्मांतील बंधू भगिनिंना नम्र आवाहन: सदरची तथाकथित  बातमी व वर्तमान पत्र १००% दोन्ही खोटी असून ती ज्यानें प्रथम तयार करून प्रसारित केली ते एक झूरळ असल्यामुळें,त्याच्याशी काय भांडणार? म्हणून दुर्लक्षित केली होती.परंतु त्याचा गैरफायदा घेत सध्यां देखील कुठली सडलेल्या मेंदूच्यांनी त्यातूनच आसूरी आंनद घेऊन ती मुद्दाम मोठ्ठ्या प्रमाणांत प्रसिध्द करण्याचा सपाटा लावलेला दिसतोय.ती देखील सडवलेल्या मेंदूची जमात मी पूर्णपणें ओळखतो.परंतु माझ्या स्वभावाला व कार्याला न ओॣळखतां,मित्र हो असा अपप्रचार,पोलीस,तुरूंग,मरण यांची भिति व पर्वा मी कधींच केलेली नाही व करणारही नाही.पण आज जे माझे अनेंक मित्र वकील व सायबर तज्ञ मला यावर कायदेशीर कारवाई करण्याचा आग्रह करीत आहेंत व तसा अभ्यासही त्यांनी सुरूं केलेला आहें.यां खटल्यांतून देखील मी माझ्या सार्वजनिक कामाला कोट्यावधी रूपये मी मिळवूं शकतो. तशी कारवाई करायलाही माझ्या लिगल् टिमने सुरूंवांत केलेली आहे.परंतु अशा किरकोळ कामांत आयुष्य घालविण्याची माझी कधींच व मुळीच इच्छा नाही.तरी ज्यांनी आपल्या अज्ञानापोटी ही बातमी शेअर करून प्रसारित केली व करीत आहेंत, त्यांनी ताबडतोब तसे करणें थांबवावें.तसेंच ज़्यांनी चुकून अथवा मुद्दाम शेअर केली पण आतां चूक लक्षांत आणून दिल्यांवर तरी ताबडतोब माझी माफी मागावी.आणि ज्यांना आजही तसें करावयाचेच नाही त्यांना मला कांहीही सांगावयाचे नाही व त्यांनी ती खुशाल प्रसारित करावी.पण मग देशाच्या वा जगांच्यां कुठल्याही भागांत माझी बदनामी झाली असेंन तेथें मला कायदेशीर सल्ला मिळेल त्याप्रमाणें मी दिवाणी अथवा फ़ौजदारी अथवा दोन्हीं कोर्टांत दाद मागावयाचे ठरवलेले आहे.याची कृपया नोंद घ्यावी.तुम्हाला तुमच्या वकीलाचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी तुमचा थोरला भाऊ या नात्यानें आठ दिवस वेळ देत आहे.या घटकेपर्यंत शेअर केलेल्यांची नांवे व पोस्ट् आम्ही निवडलेल्या आहेत.तरी तुम्हाला आतां डिलिट करून पळतांही येणार नाही.उपाय फक्त आणि फक्त माफीनामाच आहे याचीही नोंद घ्यावी.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »