Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » परीक्षा केंद्रात दहावीच्या चार विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला

परीक्षा केंद्रात दहावीच्या चार विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्रात दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरु होण्यापूर्वी एकाने चार विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली. या हल्ल्यात चौघेही जखमी झाले असून नंतर भीतीच्या सावटाखालीच अन्य विद्यार्थ्यांनी हा पेपर सोडवला. यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस हायस्कूल या दहावीच्या परीक्षा केंद्रावर इंग्रजीच्या पेपरसाठी परिक्षार्थी आले होते. यादरम्यान निखील रवींद्र सपकाळे (वय 22) याने एका परीक्षार्थीस परीक्षा केंद्रात सोडल्यानंतर दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यादरम्यान निखीलने स्वत:कडील छोटा चाकू काढत विद्यार्थ्यांवर हल्ला केला. त्यात रुपेश गुणवंत ननावरे (19), मोहित गोपाळ सोनवणे (18), सौरभ सोनवणे, गौरव अरुण सोनवणे (15) हे जखमी झाले. परीक्षा केंद्रात झालेल्या या हाणामारीमुळे गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे एपीआय दत्तात्रय निकम यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg