Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » पाकिस्तानकडून पुंछ भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून पुंछ भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडून जोरदार प्रत्युत्तर

नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान सीमेवरील पुंछ आणि नौशेरा भागात शुक्रवारी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. याला भारतीय सैन्याकडून जोरदार प्रत्युत्तरही देण्यात आले आहे.
पुंछ जिल्ह्यातील शाहपूर भागात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. मॉर्टर्स, स्वयंचलित आणि लहान बंदुकांच्या सहाय्याने त्यांनी भारतीय चौक्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, पाकिस्तानच्या या कृत्याला भारतीय जवानांनी गोळीबाराद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच राजौरी जिल्ह्यातील बाबा खोरी आणि नौशेरा भागातील कळशिअन भागात पाकिस्तानी सैन्याकडून सकाळपासून गोळीबार सुरु होता. मात्र, या गोळीबारात भारताचे कुठलेही नुकसान झालेले नसल्याचे लष्करी सुत्रांनी सांगितले आहे.
दरम्यान, सीमा सुरक्षा दलाकडून बुधवारी आणि गुरुवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सच्या अनेकांना टिपले होते. तसेच सिअरकोट येथील त्यांच्या तीन मॉर्टर चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. यानंतर आंतरराष्ट्रीय सीमेवरील सांबा भागात पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात भारताचे एक हेड कॉन्स्टेबल शहीद झाले होते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg