Breaking News
Home » Breaking News » पीएमपी’ची कात्रज-निगडी बस पुलावरून कोसळली; 18 जण जखमी

पीएमपी’ची कात्रज-निगडी बस पुलावरून कोसळली; 18 जण जखमी

पुणे : पुणे-बंगळूर महामार्गावर कात्रजहून निगडीला जाणारी पीएमपीएल बस आज (सोमवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वारजे येथे पुलावरुन झोपड्यांवर कोसळली. या घटनेत बसमधील 18 जण जखमी झाले असून, झोपडीतील एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

 सोमवारी सकाळी कात्रज-निगडी ही बस महामार्गावरुन निगडीला निघाली होती. सकाळी अकरा वाजता बस वारजे गावाजवळ पोहोचली. त्यावेळी अचानक बस डाव्या बाजूने पुलावरील रस्त्याच्या खालील जाऊन पडली. प्रवाशांनी आगोदरच खचाखच भरलेली बस पडल्याने अनेक प्रवाशांना जबर मार लागला. काही प्रवाशांना जवळील माई मंगेशकर रुग्णालय तर काही प्रवाशांना शहरातील रुग्णालयात हलविण्यात आले.बस पुलावरील रस्त्याच्या खाली पडली. तेथील खड्डा अर्धा फुट खोल आहे. मात्र त्यापुढे काही अंतरावर पुलाची खोली तब्बल 20 फुट आहे. याच पुलाच्या खाली कामगारांच्या 8 ते 10 झोपड्या आहेत. बहुतांश कामगार सकाळी कामासाठी लवकर बाहेर पडतात. आजही सर्व कामगार कामाला गेले होते. बस खाली कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी सद्यस्थिती आहे.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »