Breaking News
Home » Uncategorized » पुतळ्यांच्या विटंबनेला राज्यकर्तेच जबाबदार

पुतळ्यांच्या विटंबनेला राज्यकर्तेच जबाबदार

चंद्रकांत खैरे यांचा आरोप

औरंगाबाद: लेनिनचा पुतळा पाडल्यामुळे पुतळा विटंबनेच्या घटना देशभर घडत आहे. शिवसेना त्याचा तीव्र निषेध करते. या घटनांना राज्यकर्तेच जबाबदार असल्याचे सांगत राज्य आलं म्हणून मागच्या राज्यकर्त्यांनी उभारलेले महापुरुषांचे पुतळे पाडणे योग्य नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला. अशा घटना पुन्हा शहरात घडू नये यासाठी महापालिका आयुक्तांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना करत पोलिसांच्या सेफ सिटी प्रकल्पाचे वाभाडे शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढले.

आज (शनिवार) सकाळी सात वाजेच्या सुमारास समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला डांबर व काळा ऑईलपेंट फासल्याची घटना उघड झाली. गोपाल कुलकर्णी यांना माहीत पडताच त्यांनी पोलिसांसह या भागातील माजी नगरसेवक समीर राजूरकर, महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक ऋषिकेश खैरे, खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह जबाबदार नागरिकांना कळवली. सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अग्निशामक दलाच्या बंबाचे पाचारण केले. त्यानंतर पुतळ्याची साफसफाई करण्यात आली. डांबर काढल्यानंतर पुतळ्याची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर सावरकर प्रेमी मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्याभोवती फुलांची सजावट करून पुतळ्याचे पूजन करण्यात आली. दरम्यान, साडे नऊ वाजेच्या सुमारास सावरकर चौकात आजी माजी आमदार व नागरसेवकांसह सावरकर प्रेमी मित्रमंडळीने रस्ता रोको करण्यात आले. पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे,एसीपी गोवर्धन कोळेकर, निरीक्षक परोपकारी यांना समाजकंटकांना अटक करून कडक शासन करण्याचे निवेदन देण्यात आले. बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, शिवसेना भाजपा च्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा निषेध केला.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »