Breaking News
Home » Breaking News » पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन का – राहुल गांधी

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौन का – राहुल गांधी

केंद्रात ‘यूपीए’चे सरकार असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून आक्रमकपणे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता मौन का धारण केले आहे?. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे, तरीही पंतप्रधान बोलत नाहीत, ते गप्प का आहेत?, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसने आज भारत बंद पुकारला असून धरणे आंदोलनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने रामलीला मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शरद यादव, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. यावेळी शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केली.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »