Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत » बहुजन समाज जागा झाला तर काय होईल?

बहुजन समाज जागा झाला तर काय होईल?

भारत हा एकमेव देश आहे जिथे माणसाच्या श्रमाला किंमत नाही,पण जात व धर्माला किंमत व प्रतिष्ठा आहे.जगात शिक्षणाला खूप महत्व आहे त्यातही वेगवेगळ्या डिंगऱ्या पदव्या मिळविल्या असल्यास त्याला समाजात देशात खूप मानसन्मान मिळतो.त्याला कोणी जात धर्म विचारत नाही. भारतात मात्र कितीही  पदव्या असल्या तरी त्यांची जात व धर्म खूप महत्त्वाचा ठरतो.देशात तीन टक्केनी सर्वच ठिकाणी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.देश स्वतंत्र झाला.लोकशाही आली लोकशाहीच्या मार्गाने निवडणूका होतात.तरी ८५% टक्के लोक संख्या असलेला बहुजन म्हणजे मागासवर्गीय समाज आपल्या जातीचा लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकत नाही. तो त्या जातीचा असतो पण त्याला कोणत्याही अधिकार नसतात.ते सर्व अधिकार त्यांच्या पक्षाकडे असतात.तो बहुजन मागासवर्गीय जातीचा असूनही जातीसाठी कोणताही निर्णय घेण्यास असमर्थ असतो.पक्षाची विचारधारा आणि त्यावर भटा ब्राह्मणांचे वर्चस्व असते.
राज्यात १४५ आमदार मराठा समाजाचे आहेत, सरकार  बनण्यासाठी २८८ आमदार पैकी १४५ लागतात. तरी  राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे?. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी ५७ क्रांती मोर्चे काढावे लागले तरी प्रश्न सुटला नाही.पक्षाला बहुजन समाजातील मते मिळवुन देणारा लढाऊ नेता एकनाथराव खडसे बाहेर फेकल्या गेला आहे.माळी,धनगर आणि वंजारी (माधव) समाजाची मतदार संख्या ही प्रत्येक निवडणूकीत निर्णायक असते.यासमाजातील दिग्गज नेत्याची वर्चस्व असणाऱ्या नेत्यांनी काय हालत करून ठेवली आहे.हे शिवरायांचा महाराष्ट्र जाणतो. ” जिसकी संख्या भारी उतनी उसकी भागेदारी” असा  कांशीराम यांचा नारा होता. त्यांनी तो ऊतर भारतात चार वेळा यशस्वी करून दाखविला. राज्यातील देशातील बहुजन मागासवर्गीय समाज जागा झाला तर काय होईल.सर्व ठिकाणी वर्चस्व ठेवणाऱ्या ब्राम्हणांच्या पायाखालची जमीन कायमस्वरूपी काढून घेता येईल.करीता मागासवर्गीय समाजाला स्वतःच्या जातीतील राजकीय लाचार, दलाल,वैचारिक गुलामला बाजूला सारून गांभीर्याने विचार करावा लागेल.
बहुजन मागासवर्गीय समाजाच्या अज्ञानावरच हा समाज जगतो.त्यांचा सर्वात मोठा आर्थिक श्रोत मार्ग हा समाज आहे.तो या ब्राम्हणशाहीला कसा आर्थिक दृष्ट्या मजबुत करीत असतो यांची त्याला कल्पना नाही.ज्यांना यांची माहिती आहे ते स्वार्थासाठी, पद प्रतिष्ठेसाठी गप्प बसतात.ते सर्व समाजाचा राज्याचा देशाचा गांभीर्याने विचार करीत नाही.ते सर्व बहुजन समाजातील मागासवर्गीय तरुणांनी समजून घेतले पाहिजे. 

भारत सरकारचे वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न -१२ लाख ५४ हजार कोटी रूपये आहे, असे सरकारच सांगते.तर बहुजन मागासवर्गीय समाजाच्या देवभोळ्या स्वभावामुळे,अज्ञान किंवा भिती मुळे मंदिरात गोळा होणारे दान यांची एकूण बेरीज केली,तर मंदिरांचे वार्षिक उत्पन्न ८० लाख कोटी रूपये आहे.त्या पैशावर बहुजन मागासवर्गीय समाजाचा कोणता 

 ही अधिकार नाही. सरकारही त्यावर कोणतेही बंधन घालु शकत नाही.म्हणजे मंदिरांचे उत्पन्न हे भारत सरकारच्या उत्पन्ना पेक्षाही सहा पट जास्त आहे.हे बहुजन समाजातील मागासवर्गीय जातीतील सर्व तरुणांनी गांभीर्याने विचारात घेतले तर गांवा पासुन शहरा पर्यंत सर्व मंदिरातील उत्पन्न बंद होण्यास वेळ लागणार नाही. करीता बहुजन समाज जागा झाला पाहिजे.तर काय होईल?.
व्होट हमारा और राज भी हमारा होगा.मराठा समाजा सह मागासवर्गीय समाजाने आरक्षण मांगण्यासाठी मोर्चे आंदोलन करण्यात जेवढी शक्ती खर्च करतात.शेतकरी हमीभाव मागण्यांसाठी आंदोलने करतात.त्यापेक्षा त्यांनी मंदिरात जाणे थांबविले तर त्यांच्या स्वतःच्या उत्पन्नात व सरकारच्या उत्पन्नात भर पडेल.कारण महाराष्ट्रातील मंदिरांचे वार्षिक उत्पन्न – ४५ हजार कोटी रूपये आहे. आणि महाराष्ट्र सरकारचे वार्षिक उत्पन्न – ३४ हजार कोटी रूपये आहे.म्हणजे विचार करा मंदिरांचे उत्पन्न हे शासनाच्या उत्पन्नापेक्षा अधिक का आहे.बहुजन मागासवर्गीय समाजातील लोकांच्या दानामुळेचनां ?.
भारतात कोणत्या जाती धर्माचे मंदिर आहे.सर्वच हिंदूंचे आहेत.पण त्यावर संपूर्ण कब्जा कोणाचा आहे. ब्राम्हणांच्या पुजाऱ्यांचा देशात एकूण लक्षवेधी नोंदणीकृत 
हिंदूंची मंदिरे- ५ लाख ७६ हजार आहेत.त्या मंदिरातील पुजा-यांची संख्या-३० लाखाच्यावर.देशातील प्रसिद्ध मंदिरांतील सोने -१२ हजार ८०० मेट्रीक टन (१ मेट्रीक टन = १००० किलो) मध्ये १२८०० x १०००= १ कोटी अठ्ठावीस लाख किलो आजच्या बाजार भावानुसार मूल्य काढले किती होईल?. मंदिरांना मिळणारी किमान वार्षिक दक्षिणा – १२ लाख १००० कोटी रूपये.हे वाचुन लिहतांना मलाच घाम फुटला. एक लाख म्हणजे एकावर किती शून्य असतात हे कोणत्याही शेतकऱ्यांना किंवा कॉलेजच्या मुलामुलींना लगेच सांगता येणार नाही.मग यासर्व मंदिराच्या पैशाचा हिशेब कोण ठेवते?. मंदिराचे सारे विश्वस्त कोण ?.तर ब्राह्मण फक्त ब्राम्हणच आणि मंदिरांतील सगळे पुजारी,पुरोहीत. मग मंदिरांतील सगळी संपत्ती कुणाकडे ?.तर ब्राह्मणांकडे.ती संपत्ती त्यांच्याकडेच राहावी म्हणून मंदिर व्यवस्थापन कायद्याला १९४७ देश स्वतंत्र झाल्यावरही विरोध आहे. कुणाचा विरोध आहे तर ब्राम्हणांचा.जागतिक कीर्तीचे महाबोधी महाविहार बुद्धगया आज ही ब्राम्हण महंताच्या ताब्यात आहे.देश स्वतंत्र झाल्यावर देशातील सर्व जुन कायदे कानून रद्द झाले आणि २६ नोव्हेंबर १९४९ भारतीय संविधान देशाला अर्पण करण्यात आले.२६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला.तेव्हा पासुन ज्या जाती धर्माचे मंदिर असतील त्या जातीतील लोकांचे त्यावर व्यवस्थापन समिती नेमली जाते. मुस्लिम समाजाची मस्जिद मौलवीच्या ताब्यात असते. ख्रिश्चन समाजाचे चर्च पाद्री लोकांच्या ताब्यात असते,शिख समाजाचे गुरुद्वारा निरंकारी च्या ताब्यात असते जैन समाजाचे मुनींच्या ताब्यात असते. हिंदू धर्मातील ज्याजातीचे मंदिर असेल त्या त्या जातीकडे का नाही?.
कोल्हापूरचा जोतिबा,महालक्ष्मी, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर,
जेजुरीचा खंडोबा,शिर्डीचा साईबाबा,प्रभादेवीचा सिद्धिविनायक,अष्टविनायक,पाली,गणपती पुळे किती नांवे घ्यावी हे बहुजन समाजातील मागासवर्गीय लोकांच्यामुळे (२४x७) दिवस रात्र हाऊस फुल्ल असतात.एकमेव शेगांवच्या गजानन महाराज देवस्थान जे भटा ब्राह्मणांच्या ताब्यात नाही.म्हणूनच त्यांनी अनेक शाळा कॉलेज, तंत्रनिकेतन कॉलेज, मेडिकल कॉलेज, आंनद सागर सारखे नंदनवन बनविले त्यांचा उपभोग सर्व जाती धर्माचे लोक कुटुंबासह मोठया प्रमाणात घेतात.तिथे मराठा समाजासह मागासवर्गीय समाजाचे तरुण मोठया संख्येने मानवसेवा म्हणून आठवडा,पंधरा दिवस, महिनाभर सेवा देतात. राज्यात देशात या देवस्थाना सारखे व्यवस्थापन कुठेच पाहण्यास मिळणार नाही.
बहुजन समाजातील सर्व संकट अडचणी देवाने सोडवली पाहिजे याकरीता ते सकाळ संध्याकाळ देवपूजा, उपास तपास जे सांगितले ते करतील.मागासवर्गीय तरुणांचा यात कोणी हात धरू शकत नाही. कोणत्याही विषयाचा अभ्यास न करता आपण पास झालो पाहिजे आणि आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे ही अपेक्षा मागासवर्गीय तरुण ठेवतात.वरून आंबेडकरी चळवळीतील लोकांच्या प्रगतीचा हेवा करतील.त्यांना आरक्षण आहे म्हणून त्यांची प्रगती आहे हे सांगतील.परंतु हे लक्षात घेत नाही.की त्यांनी सर्व देवा धर्माच्या मंदिरात जाणे सोडले म्हणून त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकिय प्रगती आहे ते जागरूक असतात.ते उपवासी राहतील पण शिक्षण घेतील पुस्तक ग्रंथ विकत घेऊन वाचतील अभ्यास करतील. तसेच ब्राम्हणांची मुलंमुली फक्त एकच करतात.अहोरात्र अभ्यास करतात व नोकरी कशी मिळवता येईल एवढेच पहातात.त्यांना माहीत आहे स्पर्धा परिक्षेत अभंग विचारत नाहीत मनाचे श्लोक विचारत नाहीत. तिथे विचारतात फक्त जनरल नाॅलेज,विज्ञान,संगणक.म्हणून ते सर्व क्षेत्रात आहेत.ते परदेशात आहेत.ते सनदी अधिकारी आहेत.ते न्यायालयात आहेत.कारण सर्व ठिकाणी त्यांचीच माणस आहेत.ते एकमेकांना योग्य सहकार्य करतात. आपल्या सारखी खेकडा वृत्ती ठेऊन पाय खेचत नाही.ते दररोज मंदिरात जात नाही व दान ही टाकत नाही.म्हणूनच त्यांच्या मागे साडेसाती नाही.ही साडेसाती मागासवर्गीय समाजाच्या मागेच असते,ती साडेसाती सोडवण्यासाठी भटा ब्राह्मणांच्या सांगण्यावरून मंदिरात मागासवर्गीय समाजाची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.डोक्यावरील मेंदूच्या सर्व नसा मोकळ्या ठेऊन विचार केल्यास त्यात शिक्षण,तंत्रज्ञान, विज्ञान यांचे सर्व ज्ञान आत प्रवेश करेल.त्यामुळे एकच नाही हजारो समस्या,अडचणी सोडवण्यासाठी मार्ग मोकळा होईल.बहुजन समाज जागा झाला तर काय होईल.राज्यात केंद्रात सत्ताधारी होईल.सर्व समस्याची गुरुकिल्ली सत्तेची चाबी आहे ज्यांच्या हाती असेल ते तो सोडवेल.शिक्षण हाच एक मार्ग प्रगतीचा, प्रबोधनाचा परिवर्तनाचा आहे.तो बहुजन मागासवर्गीय समाजाने स्विकारावा,देव देव करण्यापेक्षा देवघेव (व्यवसाय ) करा.सत्यशोधक बना.सत्याचा नेहमी विजय होतो. म्हणूनच म्हणतो बहुजन समाज जागा झाला तर काय होईल?.आपसात असा भांडत राहिला तर उपासी राहील एकत्र राहिल्यास पोट भर खाईल

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई 

 

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg