Breaking News
Home » बातम्या » बाबासाहेबांची प्रतिके भगवा सत्ता हाती घेत आहेत – कॉ. नजूबाई गावीत

बाबासाहेबांची प्रतिके भगवा सत्ता हाती घेत आहेत – कॉ. नजूबाई गावीत

धुळे (यूबीजी विमर्श) – भिमा कोरेगाव शौर्य दिनाला  दि. १ जानेवारी २०१८ रोजी २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दि. २६ ऑक्टोबर २०१७ रोजी धुळ्यातील काकासाहेब बरवे कन्या छात्रालय येथे कॉ. नजूबाई गावीत यांचे अध्यक्षतेखाली भिमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शहरातील विविध समविचारी, पुरोगामी व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी बैठकीची भूमिका अँड. राहुल वाघ यांनी तर बैठकीचा उद्देश अँड. विशाल साळवे यांनी सांगितले. यावेळी  कॉ. नजूबाई गावीत म्हणाले कि, भिमा कोरेगांव मुक्ती संग्रामचा ऎतिहासिक वारसा व प्रतीके आपल्यालाच जपायचे आहे. कारण बाबासाहेबांची प्रतीके भगवा सत्ता हाती घेत  आहेत. हे रोखन्यासाठी आपल्या  सर्वांनां एकत्र येऊन हा लढा उभारायचा आहे. समाजात अनेक जातीयवाद, रुढीपरम्परा, भेदभाव उचनिचता आजही कायम आहे. जो पर्यंत स्त्री पुरुष भेदभाव नष्ट होत नाही तो पर्यंत स्त्री ही पुरूषाच्या खांद्याला खांदा लाऊन लढू शकणार नाही.
बैठकीत हर्षदा पोतदार यांनी भिमा कोरेगांव शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर घेण्यात आलेल्या बैठकीचा थोडक्यात माहिती दिली. सुधीर ढवळे यांनी एकंदरीत होणाऱ्या कार्यक्रमा विषयी भूमिका मांडून भिमाकोरेगावचा इतिहास सांगितला. यावेळी बैठकीत अनेकांनी आपले मतं व्यक्त केली. त्यात भारिपचे भैय्यासाहेब पारेराव यांनी परिषदा घेण्यात याव्यात. एस. यू. तायडे यांनी हा कार्यक्रम तरुणपिढीने हाती घेऊन यशव्ही करावा त्यास मदत व मार्गदर्शन राहील, मधुकर शिरसाठ यांनी भिमाकोरेगांवचा इतिहास पाठ्यक्रम मध्ये असावा अशी आशा व्यक्त केली. यावेळी रमेश दाणे, ए.के बोई, अँड. अबरार शेख, अँड. विनोद बोरसे, प्रा. अनिल दामोदर, प्रा. बि. एस. मोहिते, हरिश्चंद्र लोंढे, गौतम सपकाळे, चंद्रविर सावळे, सिध्दार्थ वाघ, जाधव, जगताप, ए. ओ. पाटील, भीमराव म्ह्स्के, जॉनि पवार, डॉ. संजय पाटील, विशाल थोरात, जितेंद्र खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी बैठकीचे सूत्रसंचलन अँड. उमाकांत घोडराज यांनी तर आभार गौतम सपकाले यांनी मानले.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg
Translate »