Thursday , 17 January 2019
Breaking News
Home » Breaking News » बोरिवलीत ट्रेनच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बोरिवलीत ट्रेनच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

बोरिवलीत रेल्वे रुळ ओलांडताना ट्रेनने दिलेल्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. बोरिवली- कांदिवली दरम्यान पोईसरजवळ हा अपघात घडला असून मृत्यू झालेले चौघेही एकाच कुटुंबातील आहेत.

सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ट्रेन खाली सापडून चार तरुणांचा मृत्यू झाला. बोरिवली रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली- कांदिवली दरम्यान पोईसरजवळ लोकल ट्रेनचा वेग मंदावला होता. याचदरम्यान ट्रेनमधील चार प्रवाशी खाली उतरले. मात्र, ते चौघेही विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेनखाली सापडले आणि त्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आणि दोन चुलत भावांचा समावेश आहे.

सागर संपत चव्हाण (वय २३), साईप्रसाद मनोहर चव्हाण (वय १७),मनोज दिपक चव्हाण (वय १७), दत्तप्रसाद मनोहर चव्हाण (वय २०) अशी या तरुणांची नावे आहेत. अपघातानंतर चौघांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. यातील सागर चव्हाण हा कांदिवलीतील रहिवासी असून अन्य तिघे जण त्यांच्या घरी आले होते.

About Admin

IMG-20160507-WA0000.jpg